Priyanka Gandhi Sarkarnama
महाराष्ट्र

Priyanka Gandhi News : काँग्रेसच्या अधिवेशनाला प्रियांका गांधी गैरहजर, काय आहे कारण?

Priyanka Gandhi Absent Congress Adhiveshan 2025 : लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मांडले गेले त्यावेळी मतदानाच्या दिवशी देखील प्रियांका गांधी लोकसभेत आल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली होती.

Roshan More

Congress Adhiveshan 2025 : काँग्रसचे दोन दिवशीय अधिवेशन गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडत आहे. या अधिवेशसाठी गांधी परिवारातील राहुल गांधी, सोनिया गांधी उपस्थित आहेत. मात्र, वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी गैरहजर आहेत.

लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मांडले गेले त्यावेळी मतदानाच्या दिवशी देखील प्रियांका गांधी लोकसभेत आल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली होती. काँग्रेसच्या अधिवेशनला त्या उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तेथे देखील त्या गैरहजर राहिल्या.

प्रियांका गांधी गैरहजर का राहिल्या याचे कारण काँग्रेसचे वरिष्ठ नेते, महासचिव जयराम रमेश यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे 35 अनुपस्थित होते. त्यामुळे त्यातून फक्त एका व्यक्तिला वेगळे करणे योग्य नाही.

प्रियांका गांधी यांनी लोकसभेच्या अधिवेशनाला तसेच काँग्रेसच्या अधिवेशनाला अनुपस्थित राहण्याबाबत परवानगी मागितली होती. कारण या अधिवेशनाच्या दरम्यान ते विदेशात जाणार होत्या. पूर्व सूचना देऊनच त्या अनुपस्थित राहिल्या आहेत, असे जयराम रमेश यांनी सांगितले.

65 वर्षानंतर गुजरातमध्ये अधिवेशन

काँग्रेसचे गुजरातमधील अधिवेशन खास आहे कारण महात्मा गांधींच्या काँग्रेस अध्यक्षपदाला 100 वर्ष होत आहेत.तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 जयंती देखील यंदा आहे. त्यामुळे तब्बल 64 वर्षानंतर काँग्रेसचे अधिवेशन गुजरातमध्ये होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT