Raj Thackeray : उत्तर भारतीय खासदाराची 'आगाऊ' मागणी अन् महाराष्ट्र गप्प? राज ठाकरे भडकले; म्हणाले, 'मनसे संघर्ष तीव्र करणार'?

Rajesh Verma Vs MNS Raj Thackeray : मनसेच्या हट्टाचा वाद संसदेत पोहचला असून बिहारमधील खगरिया येथील लोकजनशक्ती पार्टीचे खासदार राजेश वर्मा यांनी थेट कारवाईची मागणी केली. आता यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापलं आहे.
Rajesh Verma Vs MNS Raj Thackeray
Rajesh Verma Vs MNS Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मनसेच्या (MNS) मराठी आंदोलनाचा विषय आता थेट संसदेत गेला आहे. तर मराठीच्या हट्टातून महाराष्ट्रात राहणारे हिंदी पट्ट्यातील लोकांवर हल्ले होत आहेत. या मुद्द्याला बिहारमधील खगरिया येथील लोकजनशक्ती पार्टीचे खासदार राजेश वर्मा यांनी संसदेत हात घातला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाची मान्यताच रद्द करण्याची मागणी केली. या मागणीवरून आता नवा वाद सुरू झाला आहे. तर खासदार वर्मा यांच्या या मागणीवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट राज्यातील खासदारांना आता लक्ष करताना टीका केली आहे.

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात राहणारे उत्तर भारतीय लोकांवर मराठी भाषेवरून हल्ले होताना दिसत आहेत. तर बँकांमध्ये देखील मराठी भाषेवरून मनसेनं आपला रोख स्पष्ट ठेवला आहे. ज्यामुळे राज्यात पुन्हा एकदा हिंदी विरूध मराठी असा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

याच मुद्द्यावरून संसदेत लोकजनशक्ती पार्टीचे खासदार राजेश वर्मा यांनी मनसेवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाचे कार्यकर्ते महाराष्ट्रात उदरनिर्वाहासाठी गेलेल्या हिंदी भाषिक लोकांना मारहाण करत असल्याचा दावा देखील केला होता. तसेच येथे राहणाऱ्या उत्तप भारतीयांना महाराष्ट्र सरकारने सुरक्षा द्यावी, अशीही मागणी केली होती. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.

Rajesh Verma Vs MNS Raj Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या 'त्या' भूमिकेनंतर नाशिकमध्ये मनसेने घेतले नवे आंदोलन हाती

राज ठाकरे यांच्या मनसेकडून यावर आता जोरदार पलटवार करताना राज्यातील खासदारांना खडे बोल सुनावले आहेत. मनसेनं आपल्या एक्सवर याबाबत एक पोस्ट करत थेट राज्यातील खासदारांना तुम्हाला मराठी म्हणून याची खंत का नाही वाटत? असा सवाल केला आहे. मनसेनं आपल्या पोस्टमध्ये, काल लोकसभेत बिहारमधील लोकजनशक्ती पक्षाच्या एका खासदाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. पण यावर राज्यातील एकाही खासदाराने आवाज उठवला नाही.

पण महाराष्ट्रात मराठीचा सन्मान राखला पाहिजे, ती व्यवहारात वापरलीच पाहिजे असा आग्रह आम्ही धरत आहोत. पण काही मूठभर उत्तर भारतीयांनी आम्ही मराठी बोलणार नाही असा आवाज करत आहेत. आता त्यांचा हा आगाऊ आवाज कमी करण्यासाठी त्यांच्या कानाखाली आवाज काढायचा नाही? आणि इतर पक्षांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच आवाज काढेल, असा इशाराही दिला आहे.

Rajesh Verma Vs MNS Raj Thackeray
Raj Thackeray News : महाराष्ट्रात राहू द्यायचं का, यावर विचार करावा लागेल! राज ठाकरेंच्या नेत्यांकडून निर्वाणीचा इशारा

हा काही स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्र सैनिक संघर्ष करत नाहीयेत तर हा संघर्ष मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी सुरू आहे. मात्र संसदेत एका उत्तर भारतीय खासदाराने अशा पद्धतीने अजब मागणी केल्यानंतर महाराष्ट्रातील खासदार गप्प का बसले? असा सवाल ही राज ठाकरे यांनी थेट विचारला आहे. तसेच जर संघर्ष मराठी भाषेसाठी सुरु असताना, तुमच्या भाषेचा अवमान केला जात असतानाही त्याला विरोध केला जात नाही. मराठी म्हणून खंत का नाही वाटत? असाही सवाल राज ठाकरे यांनी यात राज्यातील खासदारांना केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com