Ashok Kharat CA property found in Koregaon Park Pune Sarkarnama
महाराष्ट्र

Ashok Kharat CA Property: पुण्यात अशोक खरातच्या CA ची अफाट 'माया'! कोरेगाव पार्कात 18 रो-हाऊस अन् 49 गुंठे जागा

Pune CA assets investigation: पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये अशोक खरातच्या सीएची अफाट संपत्ती समोर आली. 18 रो-हाऊस आणि 49 गुंठे जमीन प्रकरणाची सविस्तर माहिती वाचा.

Rashmi Mane

Huge Property Linked to Ashok Kharat CA Case: नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवी धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला असून, खरातचा चार्टर्ड अकाउंटंट प्रकाश पोफळे यांच्या नावावर असलेल्या संपत्तीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

पुण्यातील कोरेगाव पार्कसारख्या अतिशय महागड्या परिसरात प्रकाश पोफळे यांनी 2024 मध्ये तब्बल 18 रो हाऊस आणि 49 गुंठे जागा खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवहाराची कागदोपत्री किंमत 19 कोटी 56 लाख रुपये दाखवण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष बाजारभावानुसार ही किंमत 100 कोटींपेक्षा अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रकाश पोफळे यांच्याकडे एवढी मोठी रक्कम आली कुठून? अशोक खरातच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचे व्यवहार सुरू होते का? या सर्व व्यवहारांमध्ये खरातचा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का? या सर्व बाबींची सखोल चौकशी विशेष तपास पथकाकडून केली जाण्याची शक्यता आहे.

तपासादरम्यान पोलिसांच्या हाती असे पुरावे लागले आहेत की, खरात आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या नावावर पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये 18 रो हाऊस आहेत. तसेच नाशिक आणि आसपासच्या भागात सुमारे 49 गुंठे मोकळी जमीन असल्याचेही समोर आले आहे. प्रकाश पोफळे हे खरातच्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन करत होते, असा संशय तपास यंत्रणांना आहे.

'शिवनिका' ट्रस्टसह विविध माध्यमांतून जमा झालेला पैसा या मालमत्तांमध्ये गुंतवण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या मालमत्तांची खरेदी नेमकी कधी झाली, निधीचा स्त्रोत काय होता आणि त्यामध्ये बेनामी व्यवहार झाले का, याचा तपास सध्या सुरू आहे.

दरम्यान, अशोक खरात लोकांना मंत्र-तंत्राच्या नावाखाली फसवत असल्याचेही उघड झाले आहे. तो आऊटडोअर भेटीसाठी तब्बल 5 लाख रुपये फी घेत असे. अनेक श्रीमंत व्यक्ती त्याला आपल्या घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बोलावत असत आणि जास्त पैसे देणाऱ्यांनाच तो प्राधान्य देत असे.

अशोक खरातची संपत्ती?

अशोक खरातची एकूण संपत्ती सुमारे 2000 कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे 33 एकर जमीन आणि फार्महाऊस, पाथर्डी व गवाणे येथे 10 एकर, तसेच सिन्नरमध्ये 6 एकर जमीन त्याच्या नावावर आहे. याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे सुमारे 4.5 एकर आणि काकडी परिसरात 5.25 एकर जमीन असल्याची माहितीही समोर आली आहे. या सर्व संपत्तीचा तपास सुरू असून, येत्या काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT