Radhakrishna Vikhe Vs Sanjay Raut Sarkarnama
महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe : 'संजय राऊतांनी आमची काळजी करू नये, त्यांच्या विरोधात..' ; विखेंचा पलटवार!

Mayur Ratnaparkhe

Maharashtra Political News : काँग्रेसचे अनेकजण भाजपच्या संपर्कात आहेत, ते लोकासभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक बातम्या ऐकायला मिळतील. असा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विखे पाटलांना टोला लगावला, ज्यावर आता विखे पाटलांनीही राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मीडियाशी बोलताना राधाकृष्ण विखेंनी म्हटलं होतं की, 'अनेकजणांची भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे. कारण, काँग्रेसकडे आता नेतृत्व राहिलेलं नाही. याचा परिणाम उद्याच्या राजकारणात आपल्याला दिसणारच आहे. वाटाघाटी करायला नेतेमंडळी एकत्र आले आहेत, त्यामध्ये एकच विषय वाटा कोणाला आणि घाटा कोणाला. त्यांना ना कार्यकर्त्यांची काळजी आहे ना पक्षाची. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते संपर्कात आहेत, लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर अनेक बातम्या आपल्याला ऐकायला मिळतील.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी, 'राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक पक्ष बदलले आहेत. ते शिवसेनेत, काँग्रेसमध्ये होते आता भाजपमध्ये आहेत. असे जे नेते असतात त्यांना पक्षांतराविषयी फार जाण नसते. ते अशाप्रकारची वक्तव्यं करत असतात. त्यांचं संपूर्ण आयुष्य काँग्रेस पक्षात गेलेलं आहे.

मग ते शिवसेनेत आले, भाजपमध्ये गेले. त्यांच्यावर मी काय बोलणार? कोण जातयं, कोण राहतय हे येणारा काळच ठरवेल. आणि उद्या भाजपकडे सत्ता नसेल तर आपण कुठे असाल हाही विचार त्यांनी करून ठेवावा.' असा टोला लगावला होता.

आता संजय राऊतांच्या या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे(Radhakrishna Vikhe) यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. 'संजय राऊत यांनी आमची काळजी करू नये. त्यांच्या विरोधात किती प्रकरण आहेत आणि किती तक्रारी कुठे कुठे जातील याची काळजी केलेली बरी.' असं विखे पाटील म्हणाले आहेत.

मोदी दक्षिण ध्रुवावरूनही प्रचार सुरू करू शकतात-

पंतप्रधान मोदी(PM Modi) लोकसभा निवडणुकीचा प्रचार दक्षिणेकडून सुरू करणार आहेत. संख्याबळ जिथे कमी तिथून ते प्रचाराची सुरुवात करणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, 'ते पंतप्रधान आहेत. त्यांच्याकडे सर्व साधणं आहेत. दक्षिणेकडूनच काय त्यांनी दक्षिण ध्रुवावरूनही केला, जे चांद्रयान वर सोडलेलं आहे. तिथून जरी प्रचार केला तरी त्यांना कोण अडणार? ते काहीही करू शकता अमर्याद सत्ता त्यांच्याकडे आहे, यंत्रणा आणि साधणं आहेत. त्यामुळेच चांद्रायन किंवा दक्षिण ध्रुवावरूनही ते प्रचार सुरू करू शकतात.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT