New Delhi News: काँग्रेसच्या हायकमांडच्या टीममधील अत्यंत विश्वासू नेते म्हणून रमेश चेन्निथला यांचं नाव घेतलं जातं. चेन्निथला यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारी पदाचा 'चार्ज' होता. त्यांनी महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांना हाताशी धरून अडचणीत सापडलेल्या काँग्रेसला पुन्हा एकदा करण्यासाठी वेळोवेळी कठोर पावले उचलण्यातही कोणतीही कसूर सोडली नसल्याचं दिसून आलं होतं.
आंध्र प्रदेशमधील काँग्रेसमधील अनुभवी आणि मुत्सद्दी नेते असलेल्या डॉ. सिरिवेल्ला प्रसाद हे नवे महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रभारी असणार आहेत. चेन्नीथला यांच्या जागी प्रसाद यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी झारखंडचे प्रभारी पदाची जबाबदारी सांभाळली आहे. यानंतर आता त्यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्याच्या प्रभारीपदाची धुरा काँग्रेस पक्षनेतृत्वानं सोपवली आहे.
काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून शनिवारी(ता.5 सप्टेंबर) एकूण सहा राज्यांच्या प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. यात महाराष्ट्राच्या प्रभारीपदाची जबाबदारी सिरिवेल्ला प्रसाद यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. केरळच्या रमेश चेन्निथला यांच्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी म्हणून जबाबदारी होती.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे नुकतेच महाराष्ट्रातील पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाची जोरदार चर्चाही झाले आणि काँग्रेसकडून अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच राजकीय वातावरण निर्मिती करण्यात मोठं यश आल्याचं दिसून आलं होतं. यानंतर काहीच दिवसांत राहुल गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल घडवत चेन्निथला यांची रिप्लेसमेंट शोधली आहे.
डॉ. सिरिवेल्ला प्रसाद त्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेमके काय काय बदल होतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.सिरिवेल्ला प्रसाद हे यांच्याआधी केरळचे रमेश चेन्नीथला यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी म्हणून जबाबदारी होती. ते सध्या केरळचे गृहमंत्री आहेत. गृहमंत्री झाल्यानंतर गेले चार महिने महाराष्ट्र प्रभारीपद रिक्त होते.
मात्र, केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठं यश मिळालं. त्यांत त्यांचा मोठा वाटा राहिला होता. त्यामुळे काँग्रेसकडून जी काही तीन प्रमुख नावं केरळच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सर्वात पुढे होती, त्यात चेन्निथला यांच्याही नावाचा समावेश होता. मुख्यमंत्री पदासाठी त्यांचं पारडं जड मानलं जात होतं. पण ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला होता. मात्र, मंत्रिमंडळात मोठं खातं देत त्यांची नाराजी दूर करण्यात आली. आता त्यांच्याकडे असलेली महाराष्ट्राच्या प्रभारीपदाची जबाबदारी काँग्रेसनं दुसऱ्या दिग्गज नेत्याकडे सोपवली आहे.
आता सिरिवेल्ला प्रसाद यांच्या प्रभारी पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेमके काय काय बदल होणार, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.रमेश चेन्निथला यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये नवनवीन प्रयोग केले होते. तसेच महाविकास आघाडीशी जुळवून घेत काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.