Rahul Gandhi Priyanka Gandhi sarkarnama
महाराष्ट्र

Congress Politics : राहुल, प्रियंका गांधी फोडणार महायुतीला घाम, प्रचाराची रणनीती ठरली

Rahul Gandhi Priyanka Gandhi :राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांच्या सभा देखील महाराष्ट्रात होणार आहेत. सभांच्या अनुषंगाने राज्यातील नेत्यांनी केंद्रीय नेत्यांशी चर्चा केली आहे.

Roshan More

Congress Politics : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेले काँग्रेस नेते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीतील जागा वाटप अजून झाले नसले तरी काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे.

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या सभांचा धडाका असणार आहे. दोन्ही नेत्यांच्या निवडणुकीत 15 ते 20 सभा होणार आहेत.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या सभांचे नियोजन करताना प्रत्येक विभागात त्यांचे दोन सभा होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्या दृष्टीने काँग्रेस पदाधिकारी कामाला लागले आहेत.

राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांच्या सभा देखील महाराष्ट्रात होणार आहेत. सभांच्या अनुषंगाने राज्यातील नेत्यांनी केंद्रीय नेत्यांशी चर्चा केली आहे.

'मविआ'चे सरकार येणार

लोकसभेला मिळालेल्या यशाने विधानसभेत महाविकास आघाडीचे सरकार येणार, असा आत्मविश्वास काँग्रेस नेत्यांना आहे. जागा वाटपामध्ये विद्यमान आमदाराच्या जागा त्याच्या पक्षाकडे राहतील, असे सुत्र असल्याची देखील माहिती आहे. ज्या विभागात ज्या पक्षाची ताकद त्यानुसार त्या विभागात त्या पक्षाला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. विदर्भात काँग्रेसला सर्वाधिक तर मुंबईत ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळतील अशी चर्चा आहे.

मुख्यमंत्री निवडणुकीनंतर ठरणार

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रि‍पदाचा उमेदवार ठरवण्याचे आवाहन केले होते. मात्र, काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीनंतर मुख्यमंत्री ठरवू. ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असे देखील काँग्रेस नेते म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT