Ambrish Atram, Bhgyshree Atram, Dhrmraobaba Atram
Ambrish Atram, Bhgyshree Atram, Dhrmraobaba AtramSrakarnama

Ambrish Ataram News : सत्ता घरी ठेवण्यासाठी आत्राम बाप-बेटीचे राजकीय डावपेच; अंबरीश आत्रामांनी केला आरोप

Political News : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना आता पुतण्या माजी मंत्री अंबरीश आत्राम यांनी बंडखोरीचा इशारा दिल्याने अडचणीत सापडले आहेत. सत्ता घरी राखण्यासाठी बाप-बेटीची ही राजकीय खेळी असल्याचा आरोपही राजे अंबरीश यांनी केला आहे.
Published on

Nagpur News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुलगी भाग्यश्री आत्राम शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्याने आधीच त्रस्त असलेले राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना आता पुतण्या माजी मंत्री अंबरीश आत्राम यांनी बंडखोरीचा इशारा दिल्याने अडचणीत सापडले आहेत. सत्ता घरी राखण्यासाठी बाप-बेटीची ही राजकीय खेळी असल्याचा आरोपही राजे अंबरीश यांनी केला आहे.

बाबा आत्राम गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते सध्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटात आहेत. त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांना दोनच दिवसांपूर्वी तुतारी हाती घेतली आहे. यावेळी त्यांनी बाबा आत्राम (Dharmraobaba Atram) यांनी गडचिरोलीच्या विकासासाठीच काहीच केले नाही, असा जाहीर आरोप केला आहे. त्यांनी तुतारीवर बाबांच्याच विरोधात निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. मुलीनेच बंड पुकारल्याने आबा आत्राम सध्या प्रचंड अस्वस्थ आहेत. (Ambrish Ataram News)

बाबा आत्राम यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत पुतणे अंबरीश राजे आत्राम यांचा पराभव केला होता. अंबरीश राजे हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यमंत्री होते. त्यांना भाजपकडून पुन्हा एकदा निवडणूक लढवून पराभवाचा वचपा काढायचा आहे.

अजित पवार आणि भाजपची युती असल्याने त्यांच्यासमोर उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे, असे असले तरी अंबरीश राजे यांनी सुद्धा आपणच निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. भाजपने तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष लढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे अहेरी मतदारसंघात तीन आत्राम निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

Ambrish Atram, Bhgyshree Atram, Dhrmraobaba Atram
Mahayuti News : विदर्भात महायुतीला मोठा धक्का? सर्व्हेमध्ये कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा ?

बाबा आत्राम यांचा पराभव निश्चित आहे. तो समोर दिसत असल्याने त्यांच्याच सांगण्यावरून भाग्यश्री आत्राम यांनी तुतारी हाती घेतली. मुलीला सेटल करण्यासाठी बाबा आत्राम यांचे हे राजकीय डावपेच असल्याचा आरोप केला. दोघांपैकी कोणीही निवडून आले तरी सत्ता त्यांच्याच घरी राहणार आहे. हे सर्व डावपेच बाप-बेटीचे असल्याचाही दावा अंबरीश आत्राम यांनी केला आहे.

बाबा आत्राम गडचिरोली जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असताना त्यांनी पालकमंत्री पदावर दावा केला नाही. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत, असे सांगून त्यांनी भाजपसोबत मैत्री केली. लोकसभेच्या निवडणुकीत ते भाजपचे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते. त्यांना भाजपच्या नेत्यांनी तयारी करण्याची तोंडी सुचनासुद्धा केली होती. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने उमेदवार बदल करण्यास नकार दिल्याने बाबा आत्राम आणि स्थानिक भाजपच्या नेत्यांची कोंडी झाली होती.

Ambrish Atram, Bhgyshree Atram, Dhrmraobaba Atram
Narendra Modi News : विधानसभेच्या तोंडावर PM मोदी 'लकी' वर्ध्यात; मोठी घोषणा करणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com