Raj Thackeray 4 Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray : महाराष्ट्रातील फोडाफोडीचे राजकारण; ठाकरेंच्या निशाणावर भाजप आणि पवार

Raj Thackeray criticizes BJP and Sharad Pawar over party split in Maharashtra : महाराष्ट्रातील पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि शरद पवार यांच्यावर टीका केली.

Pradeep Pendhare

Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात 'ना युत्या आणि ना आघाड्या', असे म्हणत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसमोरे जाण्याचा निर्धार पक्का केला.

यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणावरून भाजपसह शरद पवारांवर टीकास्त्र सोडले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविषयी बोलताना भाजपवर निशाणा साधला. अजित पवार याता गुलाबी जॅकेट घालून फिरत आहेत. भाजपने देखील त्यांना स्वीकारलं आहे. भाजप असं कसं करू शकतं हे कळूच शकलं नाही. अजित पवार भाजपमध्ये जाण्यापूर्वी आठ दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता. त्यांना जेलमध्ये टाकू, अशी भाषा केली होती. पण त्यांना मंत्रिमंडळात टाकले, असा राज ठाकरेंनी भाजपला टोला लगावला.

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीवरून शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला. शरद पवार म्हणत आहेत की, माझा पक्ष फोडला, मग तुम्ही तुमच्या राजकीय कारर्कीदीत काय केलं? असा सवाल करत 1978 मध्ये काँग्रेस फोडली, 1991 मध्ये शिवसेना फोडली, नारायण राणेंच झाले, मग तुम्ही कशाला फोडाफोडीच्या गोष्टी करताय, असा निशाणा साधला.

लाडकीचे पैसे पुढं मिळणं बंद होणार

'महाराष्ट्रातच हे सर्व का घडत आहे, कारण सर्व मतदारांच्या लाचारीमुळे घडतं आहे. तोंडावर पैसे मारू, मत विकत घेऊ, निवडून आल्यावर ओरबाडू, युत्या, आघाड्याचे राजकारण करू. खुर्चीसाठी महाराष्ट्र लुटू, असं चालले आहे. लाकडी बहीण योजना काढली. पण मागितले कोणी पैसे? लाडकीचे पुढं पैसे येणार नाहीत, असे म्हणत एवढ्यावर जाऊ नका. पैसे वाटत आहे ना, जानेवारी आणि फेब्रुवारी, अशी परिस्थिती येईल की, त्यांना पगारासाठी पैसे नसतील.

त्याऐवजी महिलांना सक्षम बनवा. रोजगार द्या. माझ्या भगिनींनी सक्षमीकरणाचा मार्ग दाखवा. फुकट कसले पैसे देता. बेरोजगारांना पैसे देता, शेतकऱ्यांना फुकट वीज. शेतकरी बांधव फुकट वीज मागत नाही. पण, विजेत सातत्य मागत आहे. कोणी राज्यात फुकट मागत नाही. मात्र फुकटच्या सवयी लावल्या जात आहे. यात महाराष्ट्र नागडा होणार आहे. राज्य म्हणून विचार करा. हाताला काही लागणार नाही. जनतेला विनंती आहे, नीट बघ', असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT