Raj Thackeray Maharashtra Tour  Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray News: दुष्काळाचं भीषण संकट..! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मोठा निर्णय, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार; मनसैनिकांना दिले महत्त्वाचे आदेश

Maharashtra Drought News: महाराष्ट्रावर सध्या भीषण दुष्काळाचं सावट आहे. या दुष्काळामुळे आधीच आर्थिक संकटांनी अडचणीत आलेल्या बळीराजासमोर एक ना अनेक आव्हानं उभी राहिली आहे.या सर्व परिस्थितीला कंटाळून मराठवाड्यासह विदर्भातील शेतकर्‍यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: महाराष्ट्रावर सध्या भीषण दुष्काळाचं सावट आहे.या दुष्काळामुळे आधीच आर्थिक संकटांनी अडचणीत आलेल्या बळीराजासमोर एक ना अनेक आव्हानं उभी राहिली आहे.या सर्व परिस्थितीला कंटाळून मराठवाड्यासह विदर्भातील शेतकर्‍यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. सरकारकडून अग्रीम मदत म्हणून राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5000 मदत दिली जाणार आहे. मात्र,ही मदत तोकडी असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुष्काळाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत शुक्रवारी(ता.23 ऑक्टोबर) महाराष्ट्रातील 325 तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असून या गंभीर परिस्थितीचा ग्रामीण भागातील मनसे पदाधिकाऱ्यांकडून घेतला आहे. त्यांनी यावेळी दुष्काळग्रस्त भागांतील परिस्थिती,शेतकऱ्यांच्या समस्या आणि ग्रामीण जनतेला भेडसावणाऱ्या अडचणींवर चर्चा केली. याचदरम्यान पत्रकारांशी संवाद साधला.राज ठाकरेंनी दुष्काळाच्या प्रश्नासह राज्यातील विविध राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं.

तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखेर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ते दिवाळीनंतर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. राज्य सरकार दुष्काळग्रस्तांसाठी काय उपाययोजना करते ते माहीत नाही.मात्र, आम्ही आमच्या मनसे पक्षाकडून जे काही करता येणार आहे, ते करणार असल्याचंही मनसे प्रमुखांनी यावेळी माध्यमांना सांगितलं. तसेच सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेल्या अग्रीम 5 हजारांच्या मदतीनं काय होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मनसे प्रमुखांनी यावेळी मराठवाड्यातील दुष्काळावर सडेतोड भाष्य केलं. ते म्हणाले,मी मराठवाड्यासाठी सलग 20 वर्षांपासून सांगत आलो आहे की,पाण्याचं नियोजन नाही केलं, वेडंवाकडं जर पाणी वापरलं तर माझ्याकडे एक अहवाल आहे. तर मराठवाड्यात 15-20 वर्षांत वाळवंट होईल.

जर मराठवाड्याचा वाळवंट झाला तर परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी अडीचशे तीनशे वर्ष लागतील. प्रत्येकजण आपल्या पद्धतीनं विचार करतोय. तिकडे जे काही बिअरचे कारखाने सुरू असून टॅप वाटर पाणी विकलं जातंय. बोअर खोदत आहे. कसलीही परवानगी नाही. कोणी कसंही पाणी विकतंय’, असा गंभीर आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला.

हे सगळं विचित्र सर्कल आहे. आजपर्यंत शेतकरी बांधवांना वापरलं गेलं. राज्यातील 325 तालुक्यांतील शेतकर्‍यांसाठी काम न करता त्यांचं निवडणुकीसाठी मतदान होत असेल. तो शेतकरी चिडत नसेल,लोकं चिडत नसतील. निवडणुकीसाठी मतदान होत असेल,तर कशासाठी कामं करायची असा उपरोधिक टोलाही राज ठाकरे यांनी आजच्या राज्यकर्त्यांना लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT