

Mumbai News : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनके गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, 'या लोकांनी माझ्याविरोधात माणसे पेरली आहेत. आता त्यांनी नवीन डाव टाकले आहेत. यात शिंदेंची आणि भाजपची माणसं आहेत. तुम्ही याच्याविरोधात आरोप करा, पैसे घेतले म्हणा, पद मागितले असे म्हणा असे त्यांना सांगितले जात आहे. माझ्यावर आरोप करा तुमचे काय होणार नाही. उलट तुम्ही म्हणाल त्याच्यावर केस होईल असे ते त्यांना सांगत आहेत. आता यांनी नवीन सांगितले आहे की, तो जिथे असेल तिथे जायचे, त्याला चिड येईल असे बोलायचे, त्याच्या गावाकडे जायचे. बीडमध्ये असेल तिथे मुद्दाम गर्दीत जायचे. असे प्लॅनींग केले जात असल्याचा आरोपही यावेळी मनोज जरांगे यांनी केला.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब फोडून राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. साम टीव्हीचे संपादक निलेश खरे यांनी घेतलेल्या ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ मुलाखतीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
पाचशे कोटी रुपये घेतल्यांचा आरोप करून मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही गरीब माणसे आहोत, मात्र पाचशे कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. हैदराबाद गॅझेट दिले आहे. त्यासॊबतच आता पश्चिम महाराष्ट्रातील समाजासाठी गॅझेट मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. पण काही जणांना मी प्रामाणिकपणे मराठा समाजाचे काम करीत असल्याने अडचण होत आहे. भविष्यात मराठा समाज त्यामुळे माझे ऐकेल अशी भीती असल्यामुळे राजकारणी लोकांना हे सहन होत नाही. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची चौकशी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. काही राजकीय व्यक्तीकडून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जावी. ऑडिओ क्लिपची चौकशी न केल्यास फडणवीसांना जबाबदार धरणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.