Raj Thackeray and Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर सोहळ्याच्या VVIP यादीत राज ठाकरे IN तर उद्धव ठाकरे OUT!

Mayur Ratnaparkhe

अयोध्येतील श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे. यासाठी देशभरातील अनेक दिग्गजांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांचाही समावेश आहे. तर काहींना मात्र निमंत्रण गेलेले नाही आणि काहींनी स्वत:च आपण या सोहळ्यास जाणार नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातून या सोहळ्यांसाठी निमंत्रित करण्यात आलेल्यांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा समावेश असून, माजी मुख्यमंत्री शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव मात्र निमंत्रितांच्या यादीमधून गायब असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून ठाकरे गटाकडून भाजपवर टीका टिप्पणी सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, 'राम मंदिर राजकारणाचा विषय नाही. हा आस्था, अस्मिता आणि श्रद्धेचा विषय आहे. राम मंदिराच्या निर्माणासाठी हजारो कारसेवक शहीद झाले होते. काही लोक ज्यांचा भारत 2014 नंतर बनला आहे, त्यांना इतिहास नाही माहीत. जे स्वातंत्र्य लढ्यात नव्हते आणि कोणत्या मोठ्या आंदोलन किंवा संघर्षातही नव्हते. त्यांना राम मंदिराच्या संघर्षाबाबत माहीत नाही. आम्ही हिंदुत्व सोडून पळ काढला नाही, आम्ही मैदानात ठामपणे उभा होतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढलो.'

भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले आहे की, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी देशभरातील व्हीव्हीआयपींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या यादीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नाहीत मात्र, राज ठाकरे यांचं नाव आहे.

तर राष्ट्रीय पातळीवरील काही विरोधी नेत्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली आहे. यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात, काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांचा समावेश आहे. तर दिग्विजयसिंह यांना निमंत्रित करण्यात आले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT