Mumbai News: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील 'शिवतीर्था'वरच्या आपल्या दमदार भाषणानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाडवा मेळावा गाजवला. त्यांनी आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला.पण या मेळाव्यात नेहमीच राज ठाकरेंच्या टीकेच्या निशाण्यावर राहिलेल्या शरद पवारांबाबत त्यांनी वेगळीच भूमिका मांडली.
मनसेच्या 20 व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं गुरुवारी (ता.19)मुंबईतील शिवतीर्थावर राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसमोर महाराष्ट्राचा राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक,ऐतिहासिक पट उलगडून दाखवला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत व्यक्तींची नावे घेतली.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राची राजकीय परंपरा सांगताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही नाव घेतलं. या दोन्ही नेत्यांवर त्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.
राज ठाकरे शरद पवारांबाबत बोलताना म्हणाले, शरद पवार यांनी आतापर्यंत अनेक कामं केली आहेत. आमचे अनेक मतभेद असतील. पण ज्या गोष्टी योग्य आहेत, त्या योग्यच आहेत. आता तुम्ही रस्त्यावर विकण्यासाठी ठेवलेली फळं पाहतो. पूर्वी दिसत नव्हते. आपण गाडी थांबवली की, कोणीतरी फळं विकायला घेऊन येतो. शरद पवार यांनी महाराष्ट्रात फलोत्पादनात सर्वात मोठी क्रांती केल्याचंही राज ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.
तसेच आपण जी फळं पाहिली नव्हती, ती आज सर्वसामान्यांना मिळायला लागली. बारामती त्यांनी एआय टेक्नॉलॉजी आणून शेतीमध्ये क्रांती केली. आपण हे सर्व बारामतीमध्ये जाऊन पाहिले आहे, असंही राज ठाकरे यांनी भाषणात सांगितलं.
राज ठाकरेंनी यावेळी त्यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरेंबाबतही महत्वाचं विधान केलं आहे. ते म्हणाले, बाळासाहेबांनी मला एक गोष्ट सांगितली होती. ती आजही माझ्या लक्षात आहे. बाळासाहेब म्हणाले होते. आपण काय बोललो याला महत्व नसून समोरच्याला आपण काय दिलं, याला महत्व आहे. तसेच त्यांनी आपल्या हिंदूला हिंदू म्हणून मतदान करण्यास लावणारा पहिला नेता बाळासाहेब ठाकरे असल्याचंही राज ठाकरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.