Nagpur Congress News: विधानसभा अन् महापालिकेतील पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेस सावरलं; 'पदवीधर'च्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

Vidarbha Congress News: विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरत काँग्रेसने आता आगामी नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आक्रमक मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
Congress
Congress Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरत काँग्रेसने आता आगामी नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आक्रमक मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीत विजयाची परंपरा कायम राखण्यासाठी पक्षाने कठोर पाऊल उचलले आहे.

नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत नशीब अजमावलेल्या सर्व 151 उमेदवारांना मतदार नोंदणीचे कडक ''टार्गेट'' देण्यात आले आहे. जो कोणी या कामात कसूर करेल, त्याचे आगामी काळात तिकीट कापले जाईल, असा थेट इशाराच शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी देवडिया भवनातून दिला.

केवळ निवडणुकीच्या काळात सक्रिय होणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आता खऱ्या अर्थाने अग्निपरीक्षा घेतली जाणार आहे. या संदर्भात बोलावलेल्या बैठकीत प्रत्येक उमेदवाराला दरमहा किमान 250 ते 300 नवीन मतदारांची नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत.

आता राजकीय चित्र बदलले आहे. विकास ठाकरे सलग दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. मात्र त्यांच्याकडे काँग्रेसचे शहराध्यक्षपद कायम आहे. त्यांना रोखण्यासाठी पुढाकार घेतलेले तानाजी वणवे पराभूत झाले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव प्रफुल गुडधे यावेळी निवडणूक लढले नाहीत. त्यांचा पत्नी निवडून आल्या आहेत. मागील 8 वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

Congress
Harshvardhan Sapkal News: 'कोण हर्षवर्धन सपकाळ' म्हणणाऱ्या फडणवीसांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दाखवला हिसका; अमित शाह- अशोक खरात कनेक्शन समोर..?

आता राजकीय चित्र बदलले आहे. विकास ठाकरे सलग दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. मात्र त्यांच्याकडे काँग्रेसचे शहराध्यक्षपद कायम आहे. त्यांना रोखण्यासाठी पुढाकार घेतलेले तानाजी वणवे पराभूत झाले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव प्रफुल गुडधे यावेळी निवडणूक लढले नाहीत. त्यांचा पत्नी निवडून आल्या आहेत. मागील 8 वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

नागपूरमध्ये पुन्हा एकदा भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यावेळी भाजपचे 102 तर काँग्रेसचे 33 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा विरोधातच बसावे लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com