raj thackeray-uddhav thackeray  sarkarnama
महाराष्ट्र

Raj Uddhav Thackeray unity : राज ठाकरेंनी भाजप, फडणवीसांच्या कारभाराची पिसे काढली : उद्धवने दिली पाठीवर कौतुकाची थाप

Raj Thackeray BJP criticism News : भाषणाची सुरुवात या मेळाव्याप्रसंगी राज ठाकरे यांनी भाषणाची सुरवात सन्मानीय उद्धव ठाकरे असे करीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुरुवात केली.

Sachin Waghmare

Mumabai News : महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्रातील हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर शुक्रवारी उद्धव ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्र विजयी मेळावा पार पडला. मुंबईतील वरळी येथील डोम सभागृहात या विजयी मेळाव्याप्रसांगी. भाषणाची सुरुवात या मेळाव्याप्रसंगी राज ठाकरे यांनी भाषणाची सुरवात सन्मानीय उद्धव ठाकरे असे करीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुरुवात केली. त्याची परतफेड उद्धव ठाकरे यांनी सन्मानीय राज ठाकरे अशी करीत केली.

यावेळी राज ठाकरे यांनी 25 मिनिटाच्या ओघवत्या भाषणात महायुती सरकारच्या कारभाराची पिसे काढली. त्यांच्या या भाषणाने खुश झालेल्या उद्धव ठाकरे यांनी त्याचं प्रभावी भाषण ऐकून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेला ऐतिहासिक क्षण अखेर 20 वर्षांनी आला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. वरळी डोम येथे हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर ठाकरे बंधूंकडून एकत्रित विजयी मेळावा घेण्यात आला. या मेळव्यात ठाकरे बंधु एकत्र आलेले असल्याने यासाठी मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

कार्यकर्त्यांच्या घोषणांनी वरळी डोमचा परिसर दुमदुमून गेलेला यावेळी बघायला मिळाला. 20 वर्षानंतर त्यांचे कार्यकते एकमेकांना भेटताना एक वेगळा आनंद दिसत आहे. त्यातच यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून कडाडून हल्ला केला. विशेषतः त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस, शिक्षणमंत्री दादा भुसे व ठाकरेंची मुले इंग्रजी भाषेत शिकतात यावरून टीका करणाऱ्याना जोरदार प्रत्युत्तर दिले.

यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 25 मिनिटाच्या ओघवत्या भाषणात महायुती सरकारच्या कारभाराची पिसे काढली. त्यांच्या या भाषणाने खुश झालेल्या उद्धव ठाकरे यांनी त्याचं प्रभावी भाषण ऐकून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. यावेळी सर्वांचे ठाकरे बंधूंच्या बॉडी लँग्वेजकडे लक्ष लागले होते. मात्र, त्यांची देहबोली पाहता दोघेही मनाने एकत्र आल्याचे स्पष्टपणे दिसत होते.

दरम्यान, या मेळाव्याला राज ठाकरेंनी संबोधित केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठीच्या प्रयत्नांबद्दल भाष्य केले. त्यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबरदस्त टोला लगावला. “आजचा मेळावा खरं तर शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) व्हायला हवा होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं. पण सध्या पाऊस असल्यामुळे मुंबईत अशा मोठ्या मेळाव्यासाठी जागा मिळत नाहीये, असे राज ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT