Raj Thackeray : राज ठाकरेंना चॅलेंज देणाऱ्या सुशील केडीयाचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं..

MNS workers vandalize Sushil Kedia's office after his remarks challenging Raj Thackeray : मराठी भाषेवरून राज ठाकरे यांना चॅलेंज देणाऱ्या सुशील केडिया याचं ऑफिस मनसे कार्यकर्त्यांनी फोडलं आहे. सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत थेट आव्हान दिलं होतं.
MNS Workers Ransack Sushil Kedia’s Office
MNS Workers Ransack Sushil Kedia’s OfficeSarkarnama
Published on
Updated on

Sushil Kedia : मुंबईतल्या वरळी डोममध्ये एकीकडे मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज विजयी मेळावा पार पडतो आहे. तर दुसरीकडे मराठी भाषेवरून राज ठाकरे यांना चॅलेंज देणाऱ्या सुशील केडिया याचं ऑफिस मनसे कार्यकर्त्यांनी फोडलं आहे. सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत थेट आव्हान दिलं होतं. आता मनसैनिकांनी त्यांच्या स्टाईलमध्ये केडीया यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मीरा-भाईंदर येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या एका दुकानदाराला मारहाण केली होती. त्यावरुन परप्रांतीयांनी एकत्र येत मनसेविरोधात मोर्चा काढला. या दरम्यान आणखी एका सुशील केडिया नावाच्या गुंतवणुकदाराने 'मी मराठी बोलणार नाही, काय करायचंय ते करुन घ्या' अशा शब्दांत सोशल मीडियावर पोस्ट केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टॅग करुन त्यानं थेट आव्हानच दिलं. यावरुन मनसैनिकांचा चांगलाच संताप झाला.

नारळ फेकून सुशील केडिया यांचं ऑफिस फोडण्यात आलं आहे. माथाडी कामगार सेनेचे कार्यकर्त्यांनी सुशील केडियाचं ऑफिस फोडल्याची माहिती, मनसे पदाधिकारी सचिन गोळे यांनी दिली. आज ऑफिस फोडलं उद्या घरी जायलाही घाबरणार नाही असा इशारा गोळे यांनी दिला असून केडीयाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलं.

MNS Workers Ransack Sushil Kedia’s Office
Raj-Uddhav Thackeray Alliance : सडकछाप गुंडा, राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र हैं क्या ? विजयी मेळाव्याच्या आधीच भाजपच्या नेत्याची जहरी टीका

गोळे म्हणाले, मला माझ्या माथाडी कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो. केडिया नावाचा भेडिया गेली दोन दिवस झाले मराठीविरोधात गरळ ओकत आहे. राज साहेबांना त्याने आव्हान दिलं होतं. मराठी भाषेला आणि मराठी संस्कृतीला त्याने आव्हान दिलं होतं. मागील 30 वर्ष महाराष्ट्रात पैसे कमावतोय, मात्र त्याला मराठी येत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. अशा माणसांना मराठीचा अपमान करायचा असेल कर यासाठी ठोस कायदा तयार केला पाहिजे. नाहीतर राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिक अशांना धडा शिकवण्यासाठी तयार आहेतच, असं सचिन गोळे यांनी म्हटलं.

केडीया यांनी काय पोस्ट केली होती?

सुशील केडीया यांनी काल एक्सवर इंग्रजीत एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी म्हटलं की, राज ठाकरेंनी याची नोंद घ्यावी. पुढे ते लिहितात, "मी गेल्या ३० वर्षांपासून मुंबईत राहतो तरी देखील मला मराठी व्यवस्थित येत नाही. पण हिंदी भाषिकांना तुम्ही देत असलेल्या वाईट वागणुकीमुळं मी आता असा निश्चिय केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांच्या काळजीचं नाटक करण्याची परवानगी मिळत राहील तोपर्यंत मी प्रतिज्ञा करतो की, मी मराठी बोलणार नाही, काय करता बोला?"

MNS Workers Ransack Sushil Kedia’s Office
Sushma Andhare : राज-उद्धव ठाकरे एकत्र येत असताना सुषमा अंधारेंवर मोठी कारवाई; हक्कभंग मंजूर, विशेषाधिकार समिती करणार शिक्षा?

दरम्यान, या पोस्टनंतर पुन्हा एकदा सुशील केडियांनी ट्विट करत आपल्याला धमक्या येत असल्याचं म्हटलं. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना टॅग करत त्यांनी आपल्याला सुरक्षा देण्यात यावी अशीही मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com