Raj Thackeray, Dada bhuse  Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray Video : नाही म्हणजे नाही! हिंदीसाठी भेटायला आलेल्या दादा भुसेंना राज ठाकरेंनी ठणकावलं, आता सहा जुलैला ताकद दाखवणार

Raj Thackeray dada Bhuse Hindi Compulsory issu: सहा जुलैला निघणारा मोर्चा हा पक्षविरहीत मोर्चा असणार आहे. मराठी माणसाची ताकद दाखवणाऱ्या या मोर्चासाठी सर्वच राजकीय पक्षांना आमंत्रण देणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

Roshan More

Raj Thackeray News: त्रिभाषा सुत्र म्हणून पहिलीपासून हिंदी शिकवण्याचे धोरण सरकारने स्वीकरले आहे. या धोरणाला राज ठाकरेंनी विरोध केला होता. त्यामुळे त्यांची भेट घेऊन सरकारची भूमिका पटवून देण्याची जबाबदारी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर देण्यात आली होती. आज त्यांनी राज ठाकरेंची भेट घेत सरकारची भूमिका मांडली.

या चर्चेत राज ठाकरेंनी हिंदी भाषेला विरोध असल्याचे स्पष्ट सांगितले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज ठाकरे म्हणाले, नाही म्हणजे नाही. हिंदी सक्ती करू देणार नाही. तसेच इतर राज्य जे करत नाहीत ते महाराष्ट्र का करतोय? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. मराठी माणसाची ताकद दाखवण्यासाठी सहा जुलैला गिरगावमधून मोर्चा काढणार असल्याचेही राज ठाकरे यांनी जाहीर केले.

राज ठाकरे म्हणाले, सीबीएससी आणि इतर शाळांना परवानगी IAS अधिकाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दिली होती. मात्र, या शाळा आता इथल्या मराठी शाळांच्या वरचढ ठरत आहेत. तो त्यांचा प्लॅन आहे. त्यामुळे हिंदी सक्ती होऊ देणार नाही.

भुसेंना उत्तर देता आली नाहीत

राज ठाकरे म्हणाले, इतर राज्य हिंदीची सक्ती करत नसतान महाराष्ट्र ते का करतोय? अशा अनेक प्रश्नांची उत्तर दादा भुसे यांच्याकडे नव्हती. साहित्यिक देखील हिंदी सक्तीला विरोध करत आहेत. मग हे हिंदींचा आग्रह का करतायेत? सहा जुलैला मराठी माणसाची ताकद दाखवण्यासाठी मोर्चा काढला जाईल. त्यामध्ये कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल या मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूस करेल, असे देखील राज ठाकरे म्हणाले.

सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण

सहा जुलैला निघणारा मोर्चा हा पक्षविरहीत मोर्चा असणार आहे. मराठी माणसाची ताकद दाखवणाऱ्या या मोर्चासाठी सर्वच राजकीय पक्षांना आमंत्रण देणार नाही. या मोर्चात कोण येतं आणि कोण येतं नाही, हे आम्ही पाहणार असल्याचे देखील राज ठाकरे म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाही निमंत्रण देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षणामध्ये तिसऱ्या भारतीय भाषेचा समावेश यासंदर्भात राज ठाकरे त्यांच्या प्रमुख पदाधिकारी शासनाच्या अधिकारी प्रमुख चर्चा संवाद संपन्न झाला

दादा भुसे काय म्हणाले?

राज ठाकरेंसोबच्या भेटीबद्दल सांगताना मंत्री दादा भुसे म्हणाले, तिसऱ्या भाषेच्या संदर्भातील धोरण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिने कशा पद्धतीने आहे, हे आम्ही राज ठाकरेसाहेबांच्या समोर ठेवले आहे. चर्चा संपन्न झाली आहे. मला वाटतंय की या क्षणाला या गोष्टी मान्य नाही असे दिसते आहे. त्यांनी चांगल्या सूचना केल्या आहे. त्या सूचनांची देखील आम्ही नोंद घेतली आहे. या चर्चेतीलबाबी आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या समोर ठेऊ.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT