Sandeep Deshpande, Raj Thackeray, Uddhav Thackeray Sarkarnma
महाराष्ट्र

Sandeep Deshpande : मनोमिलनाच्या गोड चर्चा सुरु असतानाच मनसे नेत्याने करुन दिली कटू आठवण, म्हणाले त्यावेळी उद्धव ठाकरे पहिल्या मजल्यावरुन..

Raj Thackeray and Uddhav Thackeray reunion talks spark reaction from Sandeep Deshpande : संदीप देशपांडे यांनी यावेळी 2017 ला काय घडलं होतं ते सांगितलं. ते म्हणाले, 2017 साली देखील शिवसेना आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरु होती. पण उद्धव ठाकरेंनी त्यावेळी फसवणूक केली.

Ganesh Sonawane

Maharashtra politics : महाराष्ट्राचे राजकारण सध्या ठाकरे बंधूंच्या संभाव्य मनोमिलनावरुन ढवळून निघाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र येण्याच्या चर्चेवर अनेक राजकीय नेत्यांनी वेगवगेळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे हेही दोन दिवसांपासून यावर आपली भूमिका मांडत आहेत.

आज रविवार (दि. २०) मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यावर भाष्य केले आहे. तसेच मराठी भाषेसाठी, महाराष्ट्रासाठी संपूर्ण मराठी माणसांनी एकत्र यायला हवे. फक्त ठाकरे बंधूच का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच भाजपने कोण हिंदूत्ववादी आणि उबाठाने कोण महाराष्ट्र द्रोही आहे याचे प्रमाणपत्र देऊ नये. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसे सैनिकांवर 17 हजार गुन्हे दाखल झाले होते. ती चूक उद्धव ठाकरे यांना वाटते का? ते त्याबद्दल मनसेची माफी मागणार का? असा सवाल देशपांडे यांनी विचारला आहे.

संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, राज साहेबांनी दिलेली मुलाखत फार व्यापक स्वरुपाची आहे. पंरतु आपण सगळे जण त्याला केवळ निवडणुकीपुरते मर्यादीत करत आहोत. युतीचा विषय केवळ निवडणुकीपुरता नाही. आता काही निवडणूक नाही. जेव्हा निवडणूका येतील तेव्हा निवडणूकीचा विचार करु. पण राज राकरे यांची मुलाखत महाराष्ट्रातील प्रश्नांसदर्भात आहे.

आज हिंदी भाषेची सक्ती केली जात आहे. महाराष्ट्रातील काही उद्योग दुसऱ्या राज्यात चालले आहेत, परप्रातींयाचे लोंढे वाढत आहेत. हिंदी भाषिकांची दादागिरी चालू आहे. या मुद्द्यावर आधी चर्चा व्हायला हवी. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व मराठी पक्षांनी एकत्र यायला हवे. उद्धव ठाकरे यांनी हिंदीच्या आंदोलनास पाठिंबा दिला पाहिजे असे त्यांनी म्हटले.

सध्या भारतीय जनता पक्षाकडून हिंदूत्वाचे सर्टिफिकेट वाटण्याचे काम सुरु आहे. हा हिंदुत्वादी, हा हिंदुत्ववादी नाही..अशी सर्टीफिकेट भाजपने वाटू नये. त्याचप्रमाणे कोण महाराष्ट्र द्रोही आणि कोण महाराष्ट्र प्रेमी याचे सर्टिफेकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही. विषय निघाला तर खूप दूर पर्यंत जाईल.

भोंग्यांच्या आंदोलनावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, 17 हजार केसेस मनसैनिकांवर टाकल्या होत्या. उद्धव ठाकरेंना ती चूक वाटते का? ते महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.

पहिल्या मजल्यावरुन तळ मजल्यावर आले नाहीत

संदीप देशपांडे यांनी यावेळी 2017 ला काय घडलं होतं ते सांगितलं. ते म्हणाले, 2017 साली देखील शिवसेना आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरु होती. यासाठी मी देखील या घडामोडीमध्ये होतो. मी त्याचा साक्षीदार सुद्दा आहे. त्यावेळी त्यांना वाटले होते आम्ही 2017 साली भाजप सोबत जाऊन युती करतो की काय. 2017 ला बाळा नांदगावकर दादर वरुन मातोश्रीवर गेले पण तेव्हा उद्धव ठाकरे पहिल्या मजल्यावरुन तळ मजल्यावर देखील आले नाही. त्यावेळी आमची कशी फसवणूक झाली, ते मी सांगितले आहे असे देशपांडे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT