Ajit Pawar Politics: अजित पवार यांचा दौरा रद्द झाल्याने भुजबळ समर्थक नाराज, काय आहे कारण?

Ajit Pawar;Chhagan Bhujbal supporters support Ajit Pawar, make him a minister again-उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर येणार होते.
Chhagan Bhujbal & Ajit Pawar
Chhagan Bhujbal & Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News: उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर येणार होते. काही खाजगी कार्यक्रमांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला ते हजेरी लावणार होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काही कार्यकर्त्यांचा प्रवेश देखील होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आजचा दौरा हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रद्द झाला. हा दौरा रद्द झाल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. काही पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाची जोरदार तयारी देखील केली होती.

Chhagan Bhujbal & Ajit Pawar
Kalpana Chaumbhale Politics: आता सभापती चुंभळे यांची बारी, माजी खासदार देविदास पिंगळे यांच्यावर गंभीर आरोप!

मात्र अजित पवार यांचा आजचा दौरा रद्द झाल्याने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ समर्थकांची वेगळ्याच कारणाने निराशा झाली आहे. उपमुख्यमंत्री पवार पक्ष कार्यालयात कार्यक्रमासाठी येणार होते. या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थकांनी कार्यालयाबाहेर लावलेल्या होर्डिंग्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

Chhagan Bhujbal & Ajit Pawar
Thackerey Politics: उद्धव ठाकरेंचा शिलेदार म्हणतो,...तर पैसे, तोडफोडीच्या राजकारणाची सद्दी संपेल!

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघ प्रमुख मुकेश शेवाळे आणि ओबीसी सेल अध्यक्ष अमोल नाईक यांनी हा बॅनर लावला होता. त्यावर माजी उपमुख्यमंत्री भुजबळ आणि पक्षाचे नेते अजित पवार यांचे छायाचित्र होते. छगन भुजबळ यांना सन्मानाने पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात यावे अशी मागणी या बॅनरवर होती.

या बॅनरमुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा भुजबळ यांच्या अनुषंगाने राजकीय चर्चा सुरू झाली. राज्यात महायुतीचे नवे सरकार अस्तित्वात आल्यावर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात यंदा भुजबळ यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थक चांगलेच नाराज आहेत. छगन भुजबळ यांनी देखील व्यक्तिशः आपली नाराजी व्यक्त केली. त्यामुळे महायुतीमध्ये मंत्रिमंडळ आणि त्यात भुजबळ नसल्याने अनेक दिवस राजकीय चर्चा तापली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नाशिक जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे दोन मंत्री आहेत. याशिवाय शिवसेना शिंदे पक्षाने दादा भुसे यांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे. पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि ओबीसी वर्गाचे नेतृत्व करणारे भुजबळ यांना स्थान नसल्याने तो राजकीय चर्चेचा विषय बनला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजच्या दौऱ्यात या निमित्ताने पुन्हा एकदा भुजबळ यांच्या मंत्रिपदावर चर्चा झाली. भुजबळ समर्थकांनी आणि विशेषता त्यांच्या निकटवर्ती यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयाबाहेरच हा फलक लावला होता. त्यामुळे त्याला वेगळा संदर्भ देखील आहे. मात्र उपमुख्यमंत्री पवार यांचा दौरा हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रद्द झाला. त्यामुळे काही पदाधिकारी उपमुख्यमंत्र्यांना भेटून भुजबळ यांना मंत्रिमंडळात घ्यावे याविषयी गाऱ्हाणे सांगणार होते. या सगळ्यांचाच हिरमोड झाला आहे.

-----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com