Raj Thackeray and Uddhav Thackeray  Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray : राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? उद्धव ठाकरेंकडून 'मध्यस्थी'? दिवसभरातील पाच घडामोडींमुळे चर्चा

INDIA Alliance Uddhav Thackeray : राज ठाकरेंची इच्छा असेल तर उद्धव ठाकरेंशी चर्चा करून दिल्लीतील नेत्यांसमोर प्रस्ताव ठेवला जाईल, असे संजय राऊत म्हणाले.

Roshan More

Raj Thackeray News : इंडिया आघाडीची आज बैठक पार पडली. उद्धव ठाकरे हे या बैठकीला ऑनलाईन पद्धतीने हजर होते. या बैठकीनंतर इंडिया आघाडीला नवा भिडू भेटणार असल्याची चर्चा आहे. राज ठाकरे हे इंडिया आघाडीत सहभागी होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर थेट राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थ येथे गेले. त्यामुळे राज यांनी इंडिया आघाडीत यावे यासाठी उद्धव ठाकरे मध्यस्थी करणार असल्याची ही चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. पण दिवसभरात घडलेल्या पाच मोठ्या घडामोडींमुळे राज हे इंडिया आघाडीतसोबत जाणार असल्याच्या चर्चांना जोर आला.

पहिली घटना...

संजय राऊत यांनी आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये इंडिया आघाडीची बैठक होत असून राज ठाकरे देखील भविष्यात आघाडीत असतील का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता त्याला राऊत यांनी सूचक उत्तर दिले. ते म्हणाले, तशी राज ठाकरेंची इच्छा असेल तर उद्धव ठाकरेंशी चर्चा करून दिल्लीतील नेत्यांसमोर प्रस्ताव ठेवला जाईल. आघाडीतील पक्ष त्यावर चर्चा करतील.

दुसरी घटना...

उद्धव ठाकरे हे दुपारी 12 वाजता इंडिया आघाडीच्या बैठकीत ऑनलाईनपद्धतीने सहभागी झाले. या बैठकीत त्यांनी काही मुद्दे देखील मांडले. मात्र, बैठक संपताच ते राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले.

तिसरी घटना...

दुपारी 12.50 रश्मी ठाकरे थेट राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल

चौथी घटना ...

इंडिया आघाडीची बैठक सुरू असताना दुपारी एक वाजता भाजप आमदार प्रसाद लाड शिवतीर्थावर दाखल

पाचवी घटना

इंडिया आघाडीची बैठक संपवून उद्धव ठाकरे दुपारी 1.20 वाजता शिवतीर्थावर दाखल

घडामोडींमध्ये चर्चा सुरू

राज ठाकरे हे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करतात. महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजप विरोधी भूमिका घेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती केली. ही युती अजुनही कायम आहे. त्यामुळे राज ठाकरे हे इंडिया आघाडीत जातील या चर्चांना जोर आला आहे,

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT