Mamata Banerjee: दिल्लीत मोठ्या घडामोडी! ममतांची 'इंडिया'च्या बैठकीला उपस्थिती अन् तृणमूलचे २० खासदार नॉटरिचेबल; सुवेंदू अधिकारीही पोहोचले

Mamata Banerjee: नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक सुरु आहे. या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्यावतीनं ममता बॅनर्जी यांनी हजेरी लावली आहे.
India Bloc Mamata Banerjee
India Bloc Mamata Banerjee
Published on
Updated on

Mamata Banerjee: पश्चिम बंगाल गमावल्यानंतर ममता बॅनर्जींसाठी आता काळ कठीण बनला आहे. एकामागून एक त्यांच्या पक्षाला हादरे बसताना दिसत आहेत. मोदी सरकारच्या विरोधात विरोधकांची एकजूट म्हणून स्थापन झालेल्या इंडिया आघाडीची आज नवी दिल्लीतल कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला स्वतः ममता बॅनर्जी यांनी हजेरी लावली आहे. तर दुसरीकडं दिल्लीतच त्यांचे २० खासदार मात्र गायब झाले आहेत, अशी चर्चा आहे. या खासदारांनी एकत्र येत एक बैठकही घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

India Bloc Mamata Banerjee
Rajendra Jain: भुजबळांना ओव्हरटेक करुन राज्यसभेचा अर्ज भरणाऱ्या राजेंद्र जैन यांनी स्पष्ट केली भूमिका; राष्ट्रवादीतल्या सुप्त संघर्षावरही केलं भाष्य

ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बैठकीत

म्हणजेच एकीकडं विरोधकांची एकजूट दाखवण्यासाठी ममता बॅनर्जींनी उसणं अवसान घेऊन बैठकीला हजेरी लावली आहे. कारण त्यांच्या पाठीमागे त्यांच्याच खासदारांचं कटकारस्थान सुरु आहे. तृणमूल काँग्रेसचे २० खासदार नेमके कुठे गेले आहेत? याचा काहीही ठावठिकाणा नाही. पण हे खासदार जिकडे कुठे असतील तिथं एकतर ते दोन गोष्टींवर चर्चा करत असतील त्यापैकी एक म्हणजे लोकसभा अध्यक्षांना एक पत्र द्यायचं ज्यामध्ये आपल्याला वेगळा गट म्हणून मान्यता मिळावी. पण हा गट संसदीय पक्ष नेता अभिषेक बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली नव्हे तर दुसऱ्या पक्ष नेत्याच्या अंतर्गत असेल. त्याचबरोबर दुसरी चर्चा म्हणजे एकाच वेळी सर्वांनी राजीनामे द्यायचे. जर या दोन्हींपैकी एकही गोष्ट आज घडली तर तो ममता बॅनर्जींसाठी मोठा झटका असेल.

India Bloc Mamata Banerjee
Sharad Pawar on Bhujbal: छगन भुजबळ यांना राज्यसभेसाठी डावललं! शरद पवारांनी केलं भाष्य; नेमकं काय म्हणाले?

सुखेंदू शेखर रॉय यांचा तडकाफडकी राजीनामा

दरम्यान, आजच तृणमूलचे राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि खासदारकीची राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर तृणमूलचे ५ खासदार त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. यामध्ये बर्दमान पूर्व च्या खासदार शर्मिला सरकार, हावडाचे खासदार प्रसून बॅनर्जी, कूचबिहारचे खासदार जगदीश बसुनिया, झारग्रामचे खासदार कालिपद सोरेन आणि बांकुराचे खासदार अरुप चक्रवर्ती यांचा समावेश आहे. सुखेंदू शेखर रॉय हे तृणमूलमध्ये गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून आहेत. ते तृणमूलमधील सर्वात वयस्कर खासदार म्हणून ओळखले जात होते.

India Bloc Mamata Banerjee
Mohite Patil On Rajendra Raut : धैर्यशील मोहिते पाटलांचा राजेंद्र राऊतांवर पलटवार : ‘अकलूजला ही गोष्ट नवीन नाही; त्यांना जे वाटतंय...’

१४ खासदारांनी CM सुवेंदू अधिकारी यांची घेतली भेट

तर दुसरीकडं तृणमूलच्या १४ खासदारांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची दिल्लीत भेट घेत बैठकही घेतली आहे. ही बैठक भाजपचे नेते भुपेंद्र यादव यांच्या घरी सुरु आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आजच दिल्लीत पोहोचले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्यासोबत सुरु असलेल्या बैठीकीत तृणमूलचे १४ खासदार उपस्थित आहेत. विशेष म्हणजे या बैठकीचे फोटोही समोर आले आहेत. या बैठकीत भाजपचे नेते आणि त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लव देव हे देखील उपस्थित आहेत.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com