Raj Thackeray , Vijay Wadettiwar Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray News : कधी एका तर कधी दुसऱ्याच मंचावर; राज ठाकरेंच्या भूमिकेवर काँग्रेस नेत्याची टीका !

Sachin Waghmare

लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी उमेदवार उभे केले नव्हते. मात्र, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार केला होता या निवडणुकीत महायुतीला पराभव स्वीकारावा लागला. त्यांना मनसेचा पाठिंबा घेऊनही लोकसभा निवडणुकीत चमत्कार करता आला नव्हता.

त्यानंतर मनसेनी आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शेलक्या शब्दांमध्ये टीका केली.

प्रत्येक निवडणुकीस कधी एका मंचावर असतात तर कधी दुसऱ्या मंचावर असतात. त्यांचे निर्णय आणि त्यावर आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, असे सांगत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी सातत्याने भूमिका बदलणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली.

२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर मैदानात उतरली होती. त्यावेळी त्यांचा एक आमदार निवडून आला होता, आता या निवडणुकीत काय होते ते बघू, असे म्हणत मनसेच्या स्वबळावरील निवडणूक लढवण्याच्या घोषणेवर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली.

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या विषयी मी काय बोलणार? ते कधी एका मंचावर असतात तर कधी दुसऱ्या मंचावर असतात. त्यांचे निर्णय आणि त्यावर आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. प्रत्येक निवडणुकीगणीस पक्ष व भूमिका बदलणाऱ्या राज ठाकरे यांच्या स्वबळाची विजय वडेट्टीवार यांनी खिल्ली उडवली

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने काम केलं, त्याच पद्धतीने विधानसभेलाही करणार आहोत. कोणी कितीही खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही एकत्र लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आमचा जोर पुढील निवडणूक जिंकण्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस विदर्भात मजबूत आहे. मुंबईमध्ये काही ठिकाणी शिवसेना मजबूत आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत आहे. त्यामुळे आम्हाला येत्या निवडणुकीत विदर्भात अधिक जागा मिळावी, अशी मागणी असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT