Mumbai News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर भाजपकडून त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीला अजून तीन महिन्याचा कालावधी आहे. त्यापूर्वी जर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर त्यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता असतानाच व दुसरीकडे येत्या काळात विधानसभा निवडणुकीत काय होणार आणि त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे राज्याचे लक्ष लागले असतानाच ओबीसींचा लढा उभारलेल्या नेत्याने मोठे विधान केले आहे.
आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) उपमुख्यमंत्री नाहीतर मुख्यमंत्री होणार आणि भाजपला (Bjp) पुन्हा सोन्याचे दिवस येतील, असे मोठे वक्तव्य ओबीसींचा लढा उभारलेले नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्याला त्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. (Pankja Munde News)
राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा समाजाचा आरक्षण मुद्दा व ओबीसी समाजाचा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. गेल्या काही दिवसापासून लक्ष्मण हाके (Laxman Hake) हे कुणबी नोंदी रद्द कराव्यात, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये यासाठी ते आंदोलन करत आहेत. नुकताच त्यांनी परिसर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पंकजा मुंडे या येत्या काळात मुख्यमंत्री होतील, असे स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री वगैरे त्या काय होणार नाहीत तर त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच होतील, असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
महाराष्ट्रातील अठरा पगड जातीचे लोक एकत्र आले आहेत. त्यासोबतच आंबेडकरी जनतेने थोडा टेकू लावला तर मुस्लिम बांधवांना आता कळून चुकले आहे. त्यामुळे माणसे वास्तवाला समोर जातील. त्यामुळे येत्या काळात एक समर्थपणे महाराष्ट्र उभा करू, असेही लक्ष्मण हाके म्हणाले.
पंकजा मुंडे या आमदारच होत्या त्यावेळेसही त्या लोकनेत्याच होत्या. पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तरी त्या लोकनेत्याच आहेत. त्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. मी घराणेशाहीबाबत बोलत नाही. पंकजा मुंडे यांच्यात तेवढी क्षमता आहे.
सत्तेच्या समीकरणात जर सत्तेची गणित सोडवण्यासाठी कोणी खटपटी करत असेल तर खरा महाराष्ट्र उभा राहील. त्यामुळेच महाराष्ट्रात ओबीसी मुख्यमंत्री होऊ शकतो, असे विश्वासाने सांगतो असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी पंकजा मुंडे राज्याच्या मुख्यमंत्री झाल्यास भाजपला पुन्हा चांगले दिवस येतील, असे स्पष्ट केले.
त्या माध्यमातून येत्या काळात महाराष्ट्रात परत वाड्यावस्त्यांवर भाजपला जाण्याची संधी आहे. महाराष्ट्रातील वाड्यावस्त्यांवर व डोंगरदऱ्यामध्ये कमळ फुलवण्याची संधी भाजपकडे चालून आली आहे. त्यासाठी धैर्य भाजप दाखवणार असेल तर आम्ही यासाठी सगळे समजूतदारपणे वागणार असल्याचे सुचक विधान लक्ष्मण हाके यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.