Rajesh Witekar, Ajit Pawar  Sarkarnama
महाराष्ट्र

Rajesh Vitekar News : अजितदादांनी अखेर राजेश विटेकरांना आमदार करून दाखवलंच; विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची बाजी

Sachin Waghmare

Maharashtra MLC Elections : परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक व विश्वासू म्हणून ओळखले जातात. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून महादेव जानकर यांना उमेदवारी दिल्याने राजेश विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत विटेकर यांनी विजय मिळवत बाजी मारली.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाने राजेश विटेकर व शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनाही विजयासाठी 46 मतांची गरज होती. विधानसभेत अजित पवार गटाकडे 40 आमदारांचं संख्याबळ होते. त्याशिवाय इतर 3 आमदारांचं अजित पवार गटाला पाठबळ असल्याचे सांगितलं जात होते. उर्वरित तीन मते मिळवत त्यांनी बाजी मारली. राजेश विटेकर यांना 23 मते पडली. (Rajesh Witekar News)

विधान परिषदेच्या या चुरशीच्या निवडणुकीत महायुतीकडून नऊ जण तर महाविकास आघाडीकडून तीन जण निवडणूक रिंगणात उतरले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेश विटेकर (Rajesh witekar), शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामध्ये 2 मते घेत विटेकर विजयी झाले. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी विटेकर यांना परभणी लोकसभेची उमेदवारी दिली होती. पण त्यांचा शिवसेनेच्या संजय जाधव यांनी 42 हजार मतांनी पराभव केला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील स्पष्टवक्ते आणि बेधडक स्वभावाचे आणि दिलेला शब्द खरा करून दाखववणारे नेते म्हणून सर्वपरिचित आहेत. हे सांगण्याच कारण म्हणजे परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांना दोन महिन्यात आमदार करतो, असा शब्द लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवार यांनी दिला होता तो शब्द त्यांनी खरा करून दाखवला आहे.

विटेकर यांना मिळाले बक्षीस

वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली होती. ही फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासह तीसहून अधिक आमदार बाहेर पडले होते. त्यावेळेस मराठवाड्यात अजित पवारांची साथ देण्यामध्ये राजेश विटेकर आघाडीवर होते. त्यामुळे त्याचे बक्षीस राजेश विटेकर यांना आमदारकीच्या रूपाने मिळाले आहे.

विटेकरांवरील अन्याय दूर केला

लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात अजित पवार यांनी राजेश विटेकर यांच्यासाठी परभणी लोकसभेची जागा मागून घेतली होती. परंतु महादेव जानकर यांनी माढा, बारामतीतून लढण्याची घोषणा केल्यानंतर तडजोडीमध्ये परभणीची जागा त्यांना सोडावी लागली. राजेश विटेकर यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यावेळी जिल्ह्यातील अजित पवार समर्थक राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र, अजित पवार यांनी विटेकर यांना विधान परिषदेची संधी देत त्यांच्यावर झालेल्या अन्याय दूर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT