Video Meghna Bordikar : आमदार मेघना बोर्डीकर यांनी फाईलमध्ये नोटा ठेवल्याचे कॅमेऱ्यात कैद! विधानसभेतील व्हिडिओ व्हायरल...

Assembly Session BJP MLA Viral Video : विधानसभेचे कामकाज सुरू असताना मेघना बोर्डीकर फाईलमध्ये पैसे ठेवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
Meghna Bordikar
Meghna BordikarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांचा विधानसभेतील एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही हा व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केले आहेत. हा व्हिडिओ विधानसभेतील असून बोर्डीकर एका फाईलमध्ये पैसे ठेवत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, याबाबत बोर्डीकर यांनीही खुलासा केला आहे.

एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. तर दुसरीकडे दोन्ही सभागृहांचे कामकाजही सुरू आहे. कामकाजादरम्यान जिंतूर मतदारसंघाच्या आमदार मेघना बोर्डीकरही उपस्थित होत्या. यावेळी बोर्डीकर एका फाईलमध्ये पैसे ठेवत असल्याचे विधिमंडळाच्या कॅमेरात कैद झाले आहे.

Meghna Bordikar
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांचा आणखी एक प्रताप; नवी मुंबई पोलिसांचा गृह विभागाला अहवाल

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया सेलचे राज्य प्रमुख महादेव बालगुडे यांनी बोर्डीकर यांचा विधानसभेतील व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आहे. त्यावर त्यांनी म्हटले आहे की, व्हिडीओ बारकाईने बघा. जो अगदी काही मिनिटांपूर्वीचा आहे.

सभागृहात बाकावर बसलेल्या महिला आमदार फाईलमध्ये पैशांच्या नोटा ठेवताना दिसत आहेत. नेमका हा काय प्रकार आहे, असा प्रश्न बालगुडे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे हे पैसे फाईलमध्ये नेमके कशासाठी ठेवले याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

Meghna Bordikar
Monsoon Assembly Session : राम कदम 'संतापले', उत्तर देताना नाना पटोलेही 'भडकले', विधानसभेत वातावरण तापलं; घडलं काय?

बोर्डीकर यांचा खुलासा

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बोर्डीकर यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधी आणण्यासाठी 1000 रुपये माझ्या PA कडे देण्यासाठी ठेवले होते. ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या PA कडे सभागृहाबाहेर पाठविण्यासाठी दिले गेले, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नेमका त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकं करीत आहेत. हा प्रकार अनुचित आहे आणि सभागृहाचे पावित्र्य जपणारा नाही, अशी नाराजीही बोर्डीकर यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com