Shivaji Maharaj Statue Rajkot Sarkarnama
महाराष्ट्र

Shivaji Maharaj Statue Rajkot : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण ; उंची तब्बल 91 फूट, नवीन भव्य पुतळ्याचे वैशिष्ट्य काय?

Chhatrapati Shivaji Maharaj's 91-feet tall statue inaugurated at Rajkot Fort : मालवणच्या ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्याने उभारण्यात आलेल्या ९१ फुट उंच भव्य पुतळ्याचे लोकार्पण आज (ता. ११ ) करण्यात आले.

Ganesh Sonawane

Shivaji Maharaj Statue : मालवणच्या ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्याने उभारण्यात आलेल्या ९१ फुट उंच भव्य पुतळ्याचे लोकार्पण आज (ता. ११ ) करण्यात आले. या भव्य लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, तसेच राज्य मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व नितेश राणे हेही उपस्थिती होते.

यावेळी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किमान १०० वर्ष हा पुतळा कुठल्याही वातावरणात टिकेल असे सांगितले. ते म्हणाले, मागच्यावेळी दुर्देवी घटना झाली होती. त्यावेळी आमच्या सरकारने निर्धार केला होता की विक्रमी वेळेत हा पुतळा या ठिकाणी आम्ही पुन्हा प्रस्थापित करू. आज त्याचे पूजन आम्ही केले आहे. मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन करतो.

पुढील 10 वर्ष देखभालीची जबाबदारी ज्यांनी पुतळा तयार केलेला आहे, त्यांच्याकडे देण्यात आली आहे. कोकणात वेगवेगळी वादळे येतात, त्या सगळ्या वादळांचा अभ्यास करून हा पुतळा राहू शकेल अशी रचना करण्यात आली आहे. देशातील महाराजांचा सर्वात उंच पुतळा म्हणून आपण या पुतळ्याकडे पाहू शकतो असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

नवीन भव्य पुतळ्याचे वैशिष्ट्य काय?

सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील राजकोट किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा युद्धकालीन मुद्रा असलेला, तलवारधारी 60 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे.

तलवारीसह या भव्य पुतळ्याची एकूण उंची 83 फूट असून, तो 10 फूट उंच चबुतऱ्यावर उभारण्यात आला आहे. त्यामुळे जमीन पातळीपासून पुतळ्याची एकूण उंची 93 फूट इतकी आहे.

या भव्य पुतळ्याच्या निर्मितीसाठी ब्राँझ धातूचा वापर करण्यात आला आहे, ज्यामध्ये 88% तांबे, 4% जस्त आणि 8% कथिल यांचा समावेश आहे.

पुतळ्यासाठी सरासरी 6 ते 8 मिलिमीटर जाडीचे कांस्य वापरण्यात आले आहे.

पुतळ्याच्या मजबुतीसाठी ड्युप्लेक्स स्टेनलेस स्टीलचे सपोर्ट फ्रेमवर्क आणि SS 316 दर्जाचे गंजरोधक स्टील सळई वापरण्यात आल्या आहेत.

चबुतरासाठी उच्च दर्जाचे काँक्रीट तसेच स्टेनलेस सळई वापरण्यात आले आहे.

फियान, निसर्ग, तोक्ते यासारखी वादळे गेल्या काही वर्षात अधिकाधिक तीव्रतेची वारंवार उद्भवत आहेत. त्यानुसार सदर पुतळा सर्व वातावरणीय परिणामांच्या माऱ्यास योग्य प्रकारे तोंड येईल, या पद्धतीने संरचनात्मक संकल्पना करून बांधण्यात आला आहे.

ख्यातनाम व जेष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी या पुतळ्याची रचना केली असून, किमान 100 वर्षे टिकणारा असा हा शिल्पकृतीचा अद्वितीय नमुना आहे. याशिवाय पुढील 10 वर्षे या पुतळ्याच्या नियमित देखभाल व पर्यवेक्षणाची जबाबदारी कंत्राटदाराकडे सोपवण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT