Rajratna Ambedkar n manoj jarange patil sarkarnama
महाराष्ट्र

Rajratna Ambedkar : मनोज जरांगेंसाठी आंबेडकर मैदानात, मराठा आरक्षणाचे केले समर्थन

Roshan More

Rajratna Ambedkar News : मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला प्रकाश आंबेडकर यांचा विरोध आहे. त्यांनी ओबीसींच्या आरक्षणासाठी आरक्षण बचाव यात्रा काढली आहे. मात्र, मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आपल्या काकांच्या विरोधात राजरत्न आंबेडकर मैदानात उतरले आहे.

विदर्भातील मराठ्यांना, कोकणातील मराठ्यांना आरक्षण मिळत आहे. मग मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण का नाही मिळत. प्रांताच्या आधारे भेदभाव करत आहात का? मराठवाड्यातील मराठ्यांचा का समावेश करत नाही, असा सवाल राजरत्न आंबेडकर यांनी केला.

मराठा आरक्षणाला आम्ही पाठींबा दिला होता. तोच स्टँड आजही आहे. आमची कोणती फाईल ईडीकडे नाही. त्यामुळे आम्ही फडणवीसांच्या इशाऱ्यावर स्टँड बदलत नाही. मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, असे राजरत्न आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांना टोला

प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी बचाव यात्रा सुरू केली आहे. मात्र ओबीसी बचाव म्हणजे कोणापासून बचाव. पूजा खेडकर हे नाव गाजत आहे. ओबीसीमधील श्रीमंत ओबीसींचे आरक्षण अडचणीत आणत नाहीत, असे म्हणत राजरत्न आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला.

मनोज जरांगेंच्या पाठीशी

जो काही प्रश्न आहे त्याची उकल करणारे प्रतिनिधी विधिमंडळात हवे आहेत. गरीब सत्तेत हवेत. गरीब मराठा न्याय‍धीश नाहीत, प्रशासनात नाहीत. मनोज जरांगे यांनी गरीब मराठ्यांसाठी जी लढाई सुरू केली आहे त्यामध्ये आम्ही त्यांच्या मागे उभे राहणार आहोत, असे राजरत्न आंबेडकर म्हणाले आहेत.

राजरत्न आंबेडकर कोण?

राजरत्न आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू आहेत. राजरत्न आंबेडकर यांचे पणजोबा आनंदराव हे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सख्ये मोठे बंधू होते. प्रकाश आंबेडकर हे राजरत्न यांचे चुलत चुलते आहेत. बौद्ध महासभेच्या माध्यमातून राजरत्न आंबेडकर हे सक्रीय आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT