ShahajiBapu Patil: लोकसभेला सपाटून मार; तरी शहाजीबापू छातीठोकपणे म्हणतात, विधानसभेला आमचे 175 उमेदवार निवडून येणार...

ShahajiBapu Patil On Sanjay Raut : संजय राऊत काहीही बोलतात. त्यांनीच फेक न्यूज टाकायला सुरुवात केली. महाराष्ट्रातील वातावरण गढूळ बनवायचं आणि स्वत:ची राजकीय पोळी भाजून घ्यायची,हाच संजय राऊतांचा डाव आहे. मात्र,
ShahajiBapu Patil, Eknath shinde, Devendra Fadnavis
ShahajiBapu Patil, Eknath shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Sangola News : लोकसभेनंतर आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेच्या ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी काँटे की टक्कर रंगणार आहे. यातच आता सांगोल्याचे आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार शहाजीबापू पाटील (ShahajiBapu Patil) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे.

शिंदे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी महायुती किती जागा जिंकणार याता आकडाही सांगून टाकला आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला.

आमदार शहाजीबापू म्हणाले, महायुती 175 जागांवर नक्की निवडून येईल. लोकसभेला परिस्थिती वेगळी होती, मात्र, विधानसभेला परिस्थिती वेगळी आहे. या बदलेल्या वातावरणाचा नक्कीच महायुतीला (Mahayuti) फायदा होईल असेही त्यांनी सांगितले.

ShahajiBapu Patil, Eknath shinde, Devendra Fadnavis
Mahavikas Aghadi News : अखेर ठरलं! महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा 'या' तारखेला सुटणार

यावेळी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी महायुतीतील जागा वाटपावर भूमिका स्पष्ट केली. आम्हाला विधानसभेला सन्मानपूर्वक जागा मिळतील. शिवसेनेच्या जागा वाढवण्यासाठी आमचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करणार आहेत. त्यांना पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई आणि मराठवाड्यात सन्मानपूर्वक जागा देण्यात येतील,असा विश्वासही व्यक्त केला.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, संजय राऊत काहीही बोलतात. त्यांनीच फेक न्यूज टाकायला सुरुवात केली. महाराष्ट्रातील वातावरण गढूळ बनवायचं आणि स्वत:ची राजकीय पोळी भाजून घ्यायची,हाच संजय राऊतांचा डाव आहे. मात्र,त्यांच्या या डावाला महाराष्ट्रातील जनता कदापि बळी पडणार नाही असेही आमदार शहाजीबापू पाटील यांनी ठणकावून सांगितले.

ShahajiBapu Patil, Eknath shinde, Devendra Fadnavis
Nanded Bjp News : नांदेडमध्ये सूर्यकांता पाटील, किन्हाळकरांनंतर भाजपला आणखी एक धक्का; चिखलीकर समर्थकाची काँग्रेसमध्ये एंट्री

माढा विधानसभेत अजित पवार गटातील शिंदे बंधूंमध्ये फूट पडण्याची चर्चा सुरू झाली आहे. आमदार बबन शिंदे यांचे सख्खे धाकटे भाऊ रमेश शिंदे यांनी विमानात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे विधानसभा निवडणुकीत शिंदे कुटुंबात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

बबन शिंदे हे माढा तर त्यांचे भाऊ संजय शिंदे हे करमाळ्याचे आमदार आहेत. त्यातच त्यांचे धाकटे बंधु रमेश शिंदे यांनी सुप्रिया सुळेंची भेट घतल्याने माढ्यात शिंदे बंधु आपसात झुंजण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ShahajiBapu Patil, Eknath shinde, Devendra Fadnavis
MP Sandipan Bhumre : वाईन शाॅप नियमाने, शुल्क भरून घेतले ; आरोप करणारे खोटारडे..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com