Raju Shetty
Raju Shetty Sarkarnama
महाराष्ट्र

Raju Shetty : मजूर मुलांच्या लग्नासाठी उपाययोजना करा; मुलीला 5 लाख द्या, 'स्वाभिमानी'ची सरकारकडे मागणी

Pradeep Pendhare

Raju Shetty On State Government : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकरी मजूर मुलांच्या लग्नाचा विषयावर सरकारकडे मोठी मागणी केली आहे. शेतकरी मजूर मुलांची लग्न होत नाही. हा मोठी समस्या आहे. या समस्येवर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मंथन झाले. त्यातून सरकारकडे उपाययोजनेची मागणी करण्यात आली आहे.

"35 वर्ष पुढे जे मुले आहेत, त्यांच्याशी लग्न करणाऱ्या मुलीच्या बँक खात्यावर 5 लाख रुपये सरकारने द्यावेत. राजू शेट्टी यांनी यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत ठराव मंजूर केला असून, यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे", असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी (Farmer) संघटनेची दोन दिवस बैठक झाली. या बैठकीत 15 विषयांवर ठराव मंजूर करण्यात आला. यात शेतकरी मजूर मुलांच्या लग्नाचा ठराव देखील होता. शेतकरी मजूर मुलांची लग्न होत नाही. ही महाराष्ट्रात सामाजिक समस्या बनत चालली आहे. यावर सरकारने उपाययोजना कराव्यात अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. गेल्या वर्षी देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही मागणी केली होती. यासाठी संघटनेने वरात मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. शेतकरी मुलासोबत लग्न करणाऱ्या मुलीला 10 आणि तिच्या वडिलांना 5 लाख रुपये देण्याची मागणी केली होती. आता ही मागणी शेतकरी मजूर मुलांसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दोन दिवसांच्या बैठकीत वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा झाली. शेतकरी संघटना एक जुलैपासून कर्जमुक्त अभियान राज्यात राबवणार आहे. कर्जबाजारी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधून, सरकारचे लक्ष वेधणार आहे. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे ही प्रमुख मागणी संघटनेची आहे. सरकारची शेतीविरोधातील धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी होऊ लागला आहे. यातून आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. वीज वापरली नसताना देखील वीज बिल दिली जात आहे, असा छळ सरकारकडून शेतकऱ्यांचा सुरू आहे. याचा जाब सरकारला आम्ही विचारणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

राज्यात दूध (MILK) उत्पादक शेतकरी दुधाला भाव नसल्याने त्रस्त आहे. दुधाचे दर कमी आणि उत्पादन खर्च जास्त, अशी परिस्थिती आहे. दूध उत्पादकांना सात रुपयांनी अनुदान त्वरीत देण्याची मागणी आहे. यासाठी राज्यभरात 10 जुलेला चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची छुप्यापद्धतीने लूट सुरू आहे. सरकारने त्यावर कारवाई केली पाहिजे. विमा कंपन्यांची चौकशी झाली पाहिजे. तसेच महिला बचत गटांचे कर्ज माफीची मागणी राजू शेट्टी यांनी पुढे केली.

शेत मजुरांना अपघात विमा योजनेत घ्यावे, शैक्षणिक कर्जाची हमी सरकारने घ्यावी, असा देखील ठराव करण्यात आला. याशिवाय शेतकऱ्यांच्या जमिनीवर धरणं बांधली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी फुटक मिळाले पाहिजे. ही प्रमुख मागणी पुढील काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना लावून धरणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन तुकड्यात एफआरपी देण्याची पद्धत बंद करावी. सुरत-चेन्नई महामार्ग किंवा शक्तीपीठ मार्गाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन उभारल्याचे राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ही दोन दिवस चाललेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देखील तयारी करण्यात आली आहे. संघटनेतील पदाधिकाऱ्यांना तयारीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सरकारकडे मागण्यांसंदर्भात आणि त्याच्या पाठपुराव्यासाठी कोठेही तडजोड होणार नाही. मागण्या मान्य करून घेण्यासाठी सरकारला आम्ही 'सळो की पळो' करून सोडण्याची तयारी सुरू केली आहे, असाही राजू शेट्टी यांनी इशारा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT