Suraj Revanna : धक्कादायक! पक्षातील कार्यकर्त्याशीच अनैसर्गिक संबंध ठेवल्याप्रकरणी आमदाराला अटक...

Prajwal Revanna HD Revanna HD Devegowda HD Kumaraswamy : सूरज रेवण्णा याला तरुणावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रविवारी अटक करण्यात आली आहे.
Suraj Revanna
Suraj RevannaSarkarnama

Karnataka : देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना पुन्हा मोठा धक्का बसला आहे. त्यांचे पुत्र एच. डी. रेवण्णा यांच्या दुसऱ्या आमदार मुलालाही कर्नाटक पोलिसांनी रविवारी अटक केली. काही दिवसांपुर्वीच रेवण्णा व त्यांच्या प्रत्नीसह प्रज्वल रेवण्णाला सेक्स स्कँडलप्रकरणी अटक झाली होती.

प्रज्वलचा मोठा भाऊ सूरज याला जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाच्या एका कार्यकर्त्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यामुळे सध्या दोघेही तुरुंगात आहे. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी काही दिवसांपुर्वीच केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर सूरजला अटक झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

सूरज रेवण्णा हा विधानपरिषदेचा आमदार आहे. त्याच्याविरोधात एका तरुणाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, सुरजने त्याला १६ जूनला हसन जिल्ह्यातील फार्महाऊसवर बोलवले होते. तिथे सुरजने जबरदस्तीने ओठांचे चुंबन घेतले. तसेच अनैसर्गिक लैंगिक संबंधही ठेवल्याचे आरोप तक्रारदार तरुणाने केले आहे. त्यानुसार सुरजवर शनिवारी भारतीय दंड संहितेतील कलम 377 आणि कलम 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.

Suraj Revanna
kartikeya Chouhan : 'आज दिल्लीही आपल्या नेत्यासमोर..' ; केंद्रीयमंत्री शिवराजसिंह चौहानांच्या मुलाचे विधान चर्चेत!

दरम्यान, सूरज आणि त्याचा सहकारी शिवकुमार यांनीही संबंधित तरुणाविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. लैंगिक छळाची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आर्थिक स्थिती चांगली नसल्याने नोकरीसाठी मदत करण्याची विनंदी संबंधित व्यक्तीने केली होती. लोकसभा निवडणुकीनंतर सुरजशी भेट घडवून आणण्याचे त्याला सांगितले होते, असे शिवकुमारने तक्रारीत म्हटले आहे.

कुटुंबच गोत्यात

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाचा प्रज्वलचे सेक्स स्कँडल बाहेर आले. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले. एका महिलेल्या तक्रारीवर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मतदानानंतर दुसऱ्या दिवशी प्रज्वल परदेशात पळून गेला. काही दिवसांपुर्वीच तो राज्यात परतला. त्याला लगेच पोलिसांनी अटक केली.

Suraj Revanna
NEET Paper Leak Controversy : केंद्र सरकारची मोठी कारवाई ; 'NTA' महासंचालक सुबोध कुमार यांची हकालपट्टी!

प्रज्वलची आई आणि वडिलांना अपहरणाच्या केसमध्ये अटक करण्यात आली होती. दोघेही सध्या जामीनावर तुरुंगातून बाहेर आहेत. आता सूरजलाही लैंगिक छळाच्या प्रकरणात अटक करण्यात आल्याने कर्नाटकात खळबळ उडाली आहे. सुरज हा डॉक्टर आहे. देवेगौडा यांचा मुलगा, सून आणि दोन नातूंना जेलची हवा खावी लागल्याने राजकारण तापलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com