Raju Waghmare On Uddhav Thackeray  Sarkarnama
महाराष्ट्र

Raju Waghmare On Uddhav Thackeray : 'मी मुख्यमंत्री होणार', उद्धव ठाकरे एवढीच निबंध स्पर्धा घेऊ शकतात; राजू वाघमारेंनी टायमिंग साधलं

Raju Waghmare criticism on Uddhav Thackeray birthday : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी टायमिंग साधत टीका केली. शरद पवार आणि काँग्रेस हायकमांड यांना उद्धव ठाकरे हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा मान्य नाही, असे राजू वाघमारे यांनी म्हटले आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा होत, असतानाच शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून त्यांच्यावर टीकेचा बाण सोडले जात आहेत. शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ता राजू वाघमारे यांनी टायमिंग साधत, "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पुन्हा पाहू लागलेत. पण ते 'मी मुख्यमंत्री होणार', एवढीच निंबध स्पर्धा ते घेऊ शकतात. शरद पवार आणि काँग्रेसच्या हायकमांड यांना देखील उद्धव ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून मान्य नाही", अशी फटकेबाजी केली.

शिवसेनेचे प्रवक्त राजू वाघमारे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या जीवाला धोका असताना, त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली. त्यावेळी त्यांच्या जीवाला बरेवाईट झाले असते, तर उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा प्लॅन सुरू होता. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना चोरण्याचा विषयच येत नाही. जी व्यक्ती आपल्या वडिलांना एकटं सोडते ती शिवसैनिकांना काय ठेवेल? बाळासाहेबांच्या विचारांनीच एकनाथ शिंदे राज्य चालवत आहेत, राजू वाघमारे यांनी स्पष्ट केले.

राऊतांचा चष्माच वाईट

संजय राऊत शिवसेना (Shiv Sena) एकनाथ शिंदे गटावर करत असलेल्या टिकेचा समाचार देखील राजू वाघमारे यांनी घेतला. राऊत जो चष्मा घालतात त्यातून त्यांना वाईटच दिसते. बोंब मारायची सवय लागली आहे, ते बोंबच मारत बसणार. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे नगरसेवक पदापासून राजकीय सुरवात झाली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदावर काम केलेल्या व्यक्तीला राज्याच्या प्रशासकीय कारभाराचा किती अनुभव असेल, हे सांगता येणार नाही. पण राऊत त्यांना पावसाळ्यातील छत्री कसे म्हणून शकतात. ते मोठ उगवलेलं झाड आहे. सांगलीची जागा कितीला विकली हे अगोदर संजय राऊत यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान राजू वाघमारे यांनी राऊत यांना दिले.

शिवसेनेला जास्तच जागा हव्यात

महायुती विधानसभेला सावध असून, जोराची तयारी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीला बऱ्याचा जागा उशिराने जाहीर झाल्या. त्याचा फटका आम्हाला बसला. विधानसभेला मात्र तसे होणार नाही. विधानसभेला जागा वाटप योग्य होऊन महायुती विधानसभेत चांगले यश मिळवले. भाजप नेते नारायण राणे यांनी राज्यातील 288 जागा लढवण्याचा निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे. यावर राजू वाघमारे यांनी ते मोठे नेते आहेत. किती जागेवर भाजप लढेल हा त्यांचा आणि भाजपचा विषय आहे. पण जागा वाटपात आम्हाला चांगल्या जागा मिळाल्या पाहिजेत, ही शिवसेनेची भूमिका आहे. गेल्यावेळी आम्ही 126 जागा लढल्या होत्या. यावेळी त्यापेक्षा चांगल्या जागा मिळाले, तर चांगले होईल, असे राजू वाघमारे यांनी सांगितले.

महाविकास आघाडी एकत्र नसेल

महाविकास आघाडीत एकत्र लढेल, की नाही हे माहीत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाते जागांवरून घोळ आहे. सांगलीसारखा पैसे घेऊन जागा सोडण्याचा शिवसेना ठाकरे पक्षाचा मानस आहे. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र लढेल की, नाही हे सांगता येणार नाही. मात्र महायुती राज्याच्या विकासासाठी एकसंघ राहील आणि ते विधानसभा निवडणुकीत दिसेल, असा विश्वास राजू वाघमारे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT