Praful Patel, Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Rajya sabha Election 2024 : अजितदादा कुणाला पाठवणार राज्यसभेवर? 25 जूनला निवडणूक

Election Commission News : निवडणूक आयोगाने सोमवारी राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे.

Rajanand More

Maharashtra Political News : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission News) सोमवारी (ता. 27) महाराष्ट्रातील राज्यसभेच्या (Rajya sabha Election 2024) एका जागेसाठी पोटनिवडणूकीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार ही निवडणुकीचे मतदान 25 जूनला होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. आता या जागेवर राष्ट्रवादीकडून कुणाला संधी मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.

प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते काही महिन्यांतच पुन्हा दुसऱ्या रिक्त जागेवरून खासदारही झाले. खासदारकीची मुदत जवळपास चार वर्षे बाकी असताना त्यांनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले होते. आता त्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी आयोगाकडून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. (Rajya Sabha Bye poll)

आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केलेल्या जागेची मुदत 4 जुलै 2028 पर्यंत आहे. निवडणुकीसाठी आयोगाकडून सहा जूनला नोटीफिकेशन जारी केले जाणार आहे. उमेदवारांना 13 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. तर 14 जूनला छाननी होईल. 18 जून ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर 25 जूनला सकाळी 9 ते 4 या वेळेत मतदान होईल. त्याचदिवशी सायंकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. (Ajit Pawar Latest News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रफुल पटेल यांनी राजीनामा दिलेल्या रिक्त जागेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार हे कुणाला संधी देणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निकालावरही उमेदवार कोण असेल, याचा विचार केला जाऊ शकतो. (Latest Marathi News)

दरम्यान, सातारा लोकसभेची जागा सोडत राष्ट्रवादीने भाजपला दिली. या जागेवर भाजपने राज्यसभेचे खासदार उदयनराजे यांना संधी दिली आहे. ते निवडून आल्यास त्यांना राज्यसभेचा राजीनामा द्यावा लागेल. ही जागा राष्ट्रवादी मिळणार असल्याचे संकेत अजित पवारांनी आज दिले आहेत. तसेच या जागेवर साताऱ्यातीलच उमेदवार असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT