Amit Shah Vs Sharad Pawar : 'शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना आमच्यापासून तोडलं...'; अमित शाहांचा गंभीर आरोप !

Maharashtra Lok Sabha Election 2024 : नरेंद्र मोदी आपली टर्म पूर्ण करतील. तसेच पुढेही मोदी हेच देशाचे नेतृत्व करत राहतील. याबाबत भाजप आणि मित्र पक्षामध्ये कोणताही संभ्रम नाही. विरोधक मात्र संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढेच नाही तर जून 2029 मध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीच नेतृत्व करतील..
Amit Shah Sharad Pawar Uddhav thackeray
Amit Shah Sharad Pawar Uddhav thackeray sarkarnama

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा संकल्प महायुतीने केला आहे. यासाठी विविध माध्यमातून रणनिती आखण्यात आली होती. लोकसभेच्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याआधीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) बहुमताचा टप्पा गाठलाय असा, दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. या निवडणुकीत आम्ही ४०० पार जाणारच असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला आहे.

शाह यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये शाह यांनी विविध विषयांवर थेट भाष्य करत सर्व प्रश्नांची दिलखुलास आणि स्पष्ट उत्तरे दिली आहेत. देशातील विविध लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर सहभागी असलेल्या महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित असून अजून लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा शिल्लक असतानाच महायुतीने बहुमताचा टप्पा गाठला असल्याचे शाह म्हणाले. त्यामुळे देशातील विरोधी पक्ष किती सक्षम असावा, याचा निर्णय आता अखेरच्या टप्प्यात जनतेने घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amit Shah Sharad Pawar Uddhav thackeray
Gujarat High Court : आता गुजरात सरकारवर आमचा विश्वास नाही! कोर्टात ‘हाय’होल्टेज सुनावणी…

महाराष्ट्रात शिवसेनेचे (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा बरोबर घेणार का, यावर देखील केंद्रीयमंत्री शाह यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, राज्यात आमची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती आहे. युतीत सर्वकाही आलबेल आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर देखील शाह यांनी कडक शब्दात टीकास्त्र सोडले. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपला बहुमत मिळाले होते.

शरद पवार यांनी आमचे मित्र उद्धव ठाकरे यांना आमच्यापासून तोडले. ठाकरे आमचे मित्र होते. ज्याने हे सर्व सुरू केले त्यानेच आता हे संपविले पाहिजे. शाह यांना या मुलाखतीमध्ये घड्याळाचे काटे फिरवून 2019 ची परिस्थिती पु्न्हा आणणे शक्य असते तर तुम्ही महाराष्ट्रात वेगळ्याप्रकारे गोष्टी केल्या असत्या का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना हे उत्तर दिले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) राजकारणातून निवृत्ती घेण्याचे वक्तव्य विरोधी पक्षांकडून पुढे आणले जात आहे. यावर बोलताना अमित शाह म्हणाले, मोदी आपली टर्म पूर्ण करतील. तसेच पुढेही नरेंद्र मोदी हेच देशाचे नेतृत्व करत राहतील. याबाबत भाजप आणि मित्र पक्षामध्ये कोणताही संभ्रम नाही. विरोधक मात्र संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढेच नाही तर जून 2029 मध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीच नेतृत्व करतील, असेही शाह यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात शिवसेनेशी आमचे चांगले संबंध असल्याचेही एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीयमंत्री शाह यांनी सांगितले.

Amit Shah Sharad Pawar Uddhav thackeray
Amit Shah News : समान नागरी कायद्याबाबत अमित शाहांनी केलं मोठं विधान; म्हणाले, पुढील पाच वर्षांत...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com