Chhagan bhujbal sameer Bhujbal  sarkarnama
महाराष्ट्र

NCP Chhagan Bhujbal : राज्यसभेसाठी छगन भुजबळांचे नाव फायनल? मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत वेगवान घडामोडी

Rajya Sabha Election Chhagan Bhujbal : राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचे नाव निश्चित केल्याची माहिती आहे. समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असे देखील सांगितले जात आहे.

Roshan More

Rajya Sabha Election : राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी उमेदवार ठरवण्यासाठी आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीला पक्षातील वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत चार नावांवर चर्चा झाल्याची माहिती असून छगन भुजबळ यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे.

बैठकीनंतर पार्थ पवार,सुनील तटकरे,प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या वर्षा निवास्थानी पोहोचले होते. फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे नेत छगन भुजबळ यांच्या निवास्थानी गेल्याची माहिती आहे. त्यामुळे भुजबळ यांचे नाव उमेदवारीसाठी निश्चित झाल्याचे मानले जात आहे.

छगन भुजबळ यांनी अपेक्षा व्यक्त केली होती की ते वरिष्ठ आहेत त्यांना राज्यसभेवर जाण्याची संधी मिळावी. दरम्यान, राज्यसभेवर जाताना त्यांनी मंत्रि‍पदासाठी आपले पुतणे समीर भुजबळ यांचे नाव पुढे करत मंत्रि‍पदावर दावा कायम ठेवला होता.

राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांचे नाव निश्चित झाल्यानंतर समीर भुजबळ यांची मंत्रिमंडळात एन्ट्री होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. दरम्यान, पक्षाकडून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्यापही करण्यात आलेली नाही. त्यामुळे भुजबळ यांचे नाव कायम राहणार की ऐनवेळी निर्णय बदलला जाणार याची देखील उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

समीर भुजबळांचे मंत्रिपद फिक्स

साम टिव्हीने दिलेल्या सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार छगन भुजबळ यांचे नाव राज्यसभेचा उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आले आहे. भुजबळ यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांची मंत्रिमंडळात एन्ट्री होईल, असे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT