NCP Rajya Sabha Candidate : राज्यसभेसाठी तगडी फिल्डिंग, उद्धव ठाकरेंचा माजी खासदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, सुनेत्रा पवार मोठा निर्णय घेणार

Rajya Sabha Election NCP : राज्यसभेसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडत आहेत. दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेचा माजी खासदार राष्ट्रवादीकडून ही निवडणूक लढण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.
NCP leaders hold discussions over Rajya Sabha candidature amid speculation surrounding a former Shiv Sena UBT MP.
NCP leaders hold discussions over Rajya Sabha candidature amid speculation surrounding a former Shiv Sena UBT MP.Sarkarnama
Published on
Updated on

NCP News : राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघ्या दोन दिवसांत सुरुवात होणार आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवाराचे नाव अंतिम झालेले नाही. आज राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवास्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडत आहे. या बैठकीत अंतिम नाव निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माजी खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने त्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक असल्याची चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीच्या बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात येणार नसल्याचे प्रदेशध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले होते. आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी खासदार उमेदवारीसाठी राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

शिवसेनेचा माजी खासदार असलेला तो नेता विदर्भातील असल्याची चर्चा आहे. केंद्रात मंत्रिपद देखील त्यांनी भूषवले असून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रीय असल्याचेही बोलले जात आहे.

या माजी खासदाराला राष्ट्रवादीकडून प्रतिसाद देण्यात आला नसल्याची माहिती आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांच्या नावावर चर्चा होणार आहे. त्यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, त्यांच्या पुत्राला मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी अटी त्यांनी घातल्याची माहिती आहे.

NCP leaders hold discussions over Rajya Sabha candidature amid speculation surrounding a former Shiv Sena UBT MP.
Rajya Sabha Election : राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी, राज्यसभा उमेदवारीबाबत सस्पेन्स संपणार; कोअर कमिटीच्या बैठकीत भुजबळांसह 'ही' चार नावे चर्चेत

सुनेत्रा पवार घेणार निर्णय

छगन भुजबळ यांच्यासह या बैठकीत पार्थ पवार यांच्याकडून काही नावे समोर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, प्रमोद हिंदुराव, मंत्री छगन भुजबळ, अविनाश आदिक, समीर भुजबळ यांची नाव उमेदवारी चर्चेत आहेत. अंतिम निर्णय सुनेत्रा पवार या घेणार असून येत्या दोन दिवसांत नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

NCP leaders hold discussions over Rajya Sabha candidature amid speculation surrounding a former Shiv Sena UBT MP.
Maharashtra politics : नवनीत राणांना राज्यसभा मिळणार? राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच मोठा खुलासा, स्पष्ट सांगितले, 'आमचा उमेदवार...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com