Maharashtra Politics : निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले पोलिसांना शरण येणार आहे. त्यानेच एका व्हिडीओच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची आपल्याला ऑफर देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा कासलेने केला होता. त्याने माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते.
बीडच्या सायबर पोलिस विभागातील निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासलेच्या दाव्यांमुळे पुन्हा राजकारण तापले आहे. एन्काऊंटरच्या ऑफरचा दावा केल्यानंतर त्याने पोलिसांनी आपल्याला पकडून दाखवावे, असे चॅलेंजही दिले होते. मी सायबरमध्ये काम केले आहे. वीस वर्षे पोलिस सेवेत काम केले आहे. किती टीम पाठवू द्या, मी भेटणार नाही, असे कासलेने म्हटले होते.
मी रोज दोन गाड्या चेंज करतो. इथून पुढे दोन कार्ड, दोन मोबाईल, दोन स्टेट बदलणार. सरकारने मला पकडून दाखवण्याचा प्रयत्न या सरकारने करावा, असे आव्हान कासलेने दिले होते. कासलेचा नवा व्हिडीओ आज समोर आला आहे. यामध्ये तो पोलिसांना शरण येणार असल्याचे म्हणतोय. आपण केलेले आरोप सिध्द करणार असल्याचा दावाही त्याने केला आहे.
कासलेने म्हटले आहे की, मी काल काही मित्रांशी, पत्रकार, पोलिस अधिकाऱ्यांशी बोललो. त्यानंतर मला असे जाणवले की, आता पळून उपयोग होणार नाही. मी आजपर्यंत कुठल्याही संकटाचा सामना केला. मी पोलिसांना शरण जाण्याचा निर्णय घेतला नाही. सिस्टीमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही, हे जाणवल्याचे कासलेने म्हटले आहे.
आपले दोन्ही मोबाईल लवकरच सुरू करणार असल्याचेही कासलेने सांगितले आहे. मी आरोप केलेलेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. धनंजय मुंडे वॉशिंग मशिनमधून क्लीन होऊन बाहेर येणार आहेत, अशा निशाणाही कासलेने मुंडेंवर साधला आहे. माझाच बळी जाणार आहे. आणखी दोन-चार गुन्हे दाखल होतील. मी केलेले आरोप सिध्द करून दाखवणार असल्याचा दावाही कासलेने केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.