Nashik News, 16 Apr : नाशिकच्या काठे गल्ली परिसरात असलेला अनधिकृत सातपीर दर्गा काढण्यावरून मोठा तणाव निर्माण झाला आहे. मंगळवारी मध्यरात्री या दर्ग्यावर कारवाई करण्याआधीच जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.
जमावाने पोलीसांसह (Police) वाहनांना लक्ष्य केलं. यामध्ये जवळपास 22 पोलिस जखमी झालेत. तर अनेक वाहनांचे नुकसान झालं आहे. या गोंधळाच्या परिस्थितीनंतर पोलिसांनी कडक बंदोबस्तात पहाटोपासून दर्गा हटवण्याची कारवाई पुन्हा सुरू केली आहे.
सध्या या परिसरात तणावाचे वातावरण असल्याने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर एका अफवेमुळे जमावाने दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. काठेगल्ली परिसरातील अनधिकृत दर्गा हटवण्याची कारवाई आज केली जाणार होती.
मात्र, काल रात्रीच दर्गा हटवल्याच्या अफवा पसरल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक काठेगल्ली येथे जमा झाला. यावेळी वीजपुरवठा खंडित केल्यामुळे जमाव आक्रमक झाला आणि त्याने पोलिसांवर दगडफेक केली.
जमावाच्या दगडफेकीत दोन सहाय्यक पोलिस आयुक्त आणि 20 हून अधिक पोलिस जखमी झाल्याची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेत एका पोलिस कर्मचाऱ्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. दरम्यान, दगडफेक करणाऱ्यांपैकी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नाशिक महापालिकेने कोर्टाच्या आदेशानुसार काठे गल्ली परिसरातील सातपीर या अनधिकृत दर्ग्याला 1 एप्रिल रोजी नोटीस धाडली होती. स्वत:हून दर्ग्याचे बांधकाम काढा अन्यथा तोडकाम करण्यात येईल असा इशारा पालिकेने दिला होता. त्यामुले आता पालिकेने दिलेली मुदत संपल्यामुळे अनधिकृत दर्गा हटवण्याची काम सुरू करण्यात आले आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.