Sanjay Rathod DNT Reservation Protest : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यवरून गेल्या काही दिवसापासून वातावरण तापले आहे. अंतरवलीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते उद्या 1 सप्टेंबर रोजी आरक्षण प्रश्नावर मुंबईत धडक देणार आहेत. राज्यातील आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच आता आणखी एक समाज रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी भटक्या विमुक्तांच्या आरक्षण प्रश्नी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. थेट सरकारमधील मंत्र्यानेच इशारा दिल्याने आरक्षण प्रश्न अधिकच पेटणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आता सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
मराठा समाज आरक्षणासाठी लढतोय, ओबीसी लढतोय, आम्ही तर आंदोलनाची भाषा करत नाही. पण या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकारने प्रयत्न करावे ही आमची मागणी आहे. आरक्षण मिळावं यासाठी आम्ही रस्त्यावरची ही लढाई लढू, ज्या समाजाला कायम गुन्हेगार म्हणून पाहिले जायचे, त्या समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम आम्ही करत आहोत, असा इशारा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिला आहे.
गावा खेड्यात स्वातंत्र्यानंतरही या भटक्या विमुक्त समाजाचे हाल होत आहेत. या समाजाला सुविधा नाहीत. शिक्षण नाही. समाज विखुरलेला आहे. जसं मराठा समाज आरक्षणासाठी लढतोय, ओबीसी लढतोय, आम्ही तर आंदोलनाची भाषा करत नाही. पण या समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सरकारने प्रयत्न करावे ही आमची मागणी आहे. त्यामुळेच आम्हीही आमच्या हक्कासाठी रस्त्यावरची लढाई लढण्याच्या तयारीत आहोत, असे मंत्री संजय राठोड यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं आहे. अंतरवली सराटीत जरांगे यांचं शेवटचं आणि निर्णायक आंदोलन सुरू आहे. गेल्या तीन दिवसापासून जरांगे उपोषणाला बसले आहेत. आज संध्याकाळपर्यंत जरांगे यांच्या मागण्यावर तोडगा काढू असं सरकारकडून सांगितलं जात आहे. मात्र, सरकारचा प्रस्ताव जरांगे यांना मान्य होणार की नाही हे संध्याकाळीच कळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.