

मुंबई पोलिसांनी 1 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानात करण्यात येत असलेल्या ओबीसी समाजाच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातून ओबीसी समाज मुंबईतील आझाद मैदान येथे जमणार होता. मात्र, आता पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारल्यामुळे ओबीसी समाजाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नकार दिला आहे. मल्लिकार्जुन पुजारी या नावानं ओबीसी समाजाच्या आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज दाखल केला होता.
कोयना एक्स्प्रेसमधून धूर निघू लागल्याने प्रवाशांनी घाबरून चालत्या रेल्वेतून उड्या टाकल्या. त्यामुळे ट्रेन तातडीने थांबविण्यात आली. कर्जत बसस्थानकादरम्यान ही घटना घडली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने तांत्रिक तपासणी केली असता कोणताही धोका नसल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
नवी मुंबईतील खारघर येथील भाजप कार्यकर्ता सूरज पाटील याच्याकडे ३५०० एसआयआरचे फार्म आढळून आले होते. याप्रकरणी सूरज पाटील याच्यावर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच पाच बीएलओंवर जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. सूरज पाटील याच्याकडून हे अर्ज ताब्यात घेऊन सील करण्यात आले आहेत.
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस छात्र परिषदेच्या आयोजकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोलकत्ता उच्च न्यायालयाचे उल्लघंन केल्याप्रकरणी पश्चिम बंगाल पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. ममता बॅनर्जी समर्थकांकडून बॅरिकेड्स बाजूला ढकलून पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा, तसेच वाहतुकीला अडथळा आल्याचा आरोपही होत आहे.
गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यावर आज खासदार धनंजय महाडिक यांनी मोठे भाष्य केले आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध झाली तर चांगलीच आहे. पण सध्या बिनविरोधाचा प्रस्ताव कोणालाही देणार नाही. महायुती मधील चारीही घटक पक्षांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तसा कोणताही प्रस्ताव देण्याची आवश्यकता आम्हाला नसल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलं. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
हिंगोलीमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनीच सरकार आणि शिक्षण अधिकाऱ्याची पोलखोल केली आहे. 'स्कूल ठीक करो अभियाना अंतर्गत' जिल्हा परिषदेच्या शाळांची पाहणी करण्यासाठी हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील जामदया गावात अभिजीत दिपके पोहोचले असताना शिक्षकांनीच शिक्षण मंत्री प्रशासन व शिक्षण अधिकाऱ्यांची पोलखोल केली आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेत पत्रांना छिद्र पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शाळेत अध्यापनाचे धडे घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना वर्गामध्ये पावसात भिजून शिक्षण घ्यावे लागत असल्याचं गावकरी व शिक्षकांनी अभिजीत दिपके यांना सांगितले. तर आम्ही शासनाकडे वेळोवेळी शाळा दुरुस्तीसाठी विनंती केली मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचं सांगण्यात आले.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेची व्यवहार्यता तपासण्यासाठी काकोडकर समिती स्थापन करण्यात आली असून, समितीला ६० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पुणे-अहिल्यानगर आणि नाशिक रोड-शिर्डी या दोन स्वतंत्र प्रकल्पांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असल्याचं खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलं. त्यामुळे या प्रक्रियेला थेट पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला मंजुरी मिळाल्याचं म्हणणं चुकीचं असल्याचा दावा त्यांनी केला. माध्यमांनी या विषयाची व्यवस्थित माहिती घेऊनच बातमी करावी, अशी विनंतीही त्यांनी केली. मुख्यमंत्री काकोडकर समितीची घोषणा करत असताना अशा बातम्यांमुळे महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेबाबत गैरसमज निर्माण होत असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने तळोदा येथील दोन जबरी चोरी आणि उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील मोटारसायकल चोरी असे एकूण 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत तळोदा) येथील तिघांना ताब्यात घेण्यात आले.संशयितांकडून चोरीची मोटारसायकल आणि जबरीने हिसकावलेले मोबाईल असा एकूण 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे आरोपी मोटारसायकलवरून ज्येष्ठ नागरिकांना अडवून त्यांचे मोबाईल हिसकावून पसार होत असत. पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
हिंगोलीत आज सीजीपीचे अभिजीत दिपके ग्रामीण भागात शाळांची पाहणी करत आहेत. केसापूर गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी गावकऱ्यांशी संवाद साधला. शाळेच्या इमारतीची पाहणी केली. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी जे पाणी वापरलं जातं त्या पाण्याच्या टाकीवर जाऊन देखील त्यांनी पाहणी केली. यावेळी शाळेच्या परिस्थितीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. अभिजीत दिपके हे स्वतः टाकीवर चढून त्यांनी टाकीतील पाण्याची पाहणी केली आहे.
188-पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण 2026 अंतर्गत अत्यंत गोपनीय व महत्त्वाची असलेली निवडणूक आयोगाची गणना प्रपत्रे बेकायदेशीररीत्या ताब्यात बाळगून त्यांची झेरॉक्स काढल्याचा धक्कादायक प्रकार खारघर परिसरात उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित 5 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मराठ्यांच्या 58 लाख नोंदी असल्याचा मनोज जरांगे यांच्याकडून वारंवार करण्यात येणारा दावा चुकीचा असल्याची टीका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केली आहे. जरांगे वारंवार ज्या 58 लाख नोंदींचा दावा करतात, त्यापैकी 98 टक्के नोंदी या 2023 पूर्वीच्या, म्हणजेच जरांगे यांच्या आंदोलनापूर्वीच्या आहेत. एवढेच नाही, तर या 58 लाख नोंदी असलेल्या बहुतांश व्यक्तींना जात प्रमाणपत्र आणि त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्रही मिळाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे आंदोलक अत्यंत आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून संतप्त झालेल्या मराठा कार्यकर्त्यांनी थेट राज्याच्या सहकार मंत्र्यांच्या गाडीसमोर जोरदार घोषणाबाजी केली असून, त्यांना मराठा समाजाच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले आहे.
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘भक्ती संगम’ कार्यक्रमाच्या उद्घाटनाला नाशिककरांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचं चित्र पाहायला मिळालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सहाहून अधिक मंत्री कार्यक्रमाला उपस्थित असतानाही सभागृहातील निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या. कार्यक्रमस्थळी गर्दी वाढवण्यासाठी शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पाचारण करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, दोन हजार आसनक्षमता असलेल्या सभागृहात मोठ्या प्रमाणात खुर्च्या रिकाम्या राहिल्याने आयोजकांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिककरांमध्ये असलेला रोष आणि प्रशासनाच्या कारभाराबाबतची नाराजी या निमित्ताने पुन्हा चर्चेत आली आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या तयारीच्या सुरुवातीलाच प्रशासन आणि नाशिककर यांच्यातील नाराजी समोर आल्याची चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नेपाळमध्ये अडकलेल्या 106 भाविकांचा महाराष्ट्राकडे सुरक्षित परतीचा प्रवास सुरू झाला आहे. यात चार जण नगपुरात दाखल झाले आहे. नेपाळपासून पटणापर्यंत भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक समन्वय आणि मदत मिळलायचं आभार मानले आहेत. महाराष्ट्रात सुखरूप परतण्यासाठी रेल्वे प्रवासाची व्यवस्था केली असून यासाठी मुख्यमंत्री आणि तेथील खासदार राणा यांनी आभार मानले आहेत. आज सकाळी 7:36 वाजता रेल्वे क्र. 17609 ने पटणाहून नागपूरकडे सर्व भाविक सुखरूप रवाना झाले. संकटाच्या काळात तातडीने मदत केल्याबद्दल सर्व भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं आहे.
राहुल गांधी यांनी देशातील दलित समाजाला भेडसावणाऱ्या सामाजिक भेदभावाच्या मुद्द्यावरून भाष्य केलं आहे. “दलितांना पिण्याच्या पाण्याचीही अडचण,” असा उल्लेख करत त्यांनी दलित समाजाला मूलभूत सुविधा आणि समान हक्क मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाच्या बदललेल्या मार्गाला आता शिर्डी जोडण्याच्या पर्यायाला वेग आला आहे. नाशिक रोड ते साईनगर शिर्डी या मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ९५ किलोमीटरच्या दुहेरी रेल्वेमार्गाची तयारी सुरू आहे. या मार्गामुळे नाशिक आणि शिर्डीला रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार असून, पुढील टप्प्यात पुण्याशी जोडणीचा पर्यायही चर्चेत आहे.
लातूरच्या उदगीर तालुक्यात एका कंत्राटदारानं टोकाचं पाऊल उचललं आहे... दयानंद हुले असं वायगावमध्ये आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचं नाव आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही... या घटनेची माहिती मिळताच उदगीर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे...
समृद्धी महामार्गावर तरुणाची सोन्याची चेन लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवासादरम्यान तरुणाला लक्ष्य करत चोरट्यांनी सोन्याची चेन लंपास केल्याची माहिती आहे. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर जोरदार टीका केली आहे. “शेवटचा लढा, ओबीसी आरक्षण गाडा हा जरांगेंचा डाव,” असा आरोप करत हाके यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका मांडली आहे.
दीर्घ आजारपणानंतर भाजपाचे आमदार तथा माजी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित पुन्हा राजकीयदृष्ट्या सक्रिय झाले आहेत. नंदुरबारमध्ये SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाच्या आढावा बैठकीला त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मतदानापासून एकही मतदार वंचित राहू नये, तसेच दुबार नोंदणी टाळण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. डॉ. गावित पुन्हा सक्रियपणे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
खारघरमध्ये एसआयआर अर्जांच्या मुद्यावरून मनसे नेते अमित ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पश्चिम बंगालमध्ये जे घडले, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही भाजपचे मतदार कायम ठेवून इतर मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. शासनाकडून हे अर्ज छायांकेंद्रांपर्यंत कसे पोहोचले, याचा जाब विचारला पाहिजे, असेही अमित ठाकरे यांनी म्हटले.
सरकार दडपशाहीच्या मार्गावर चालले असून, अशा प्रकारच्या किती घटना सुरू आहेत, याची माहितीही समोर येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी सरकारच्या कारभाराचा जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहनही अमित ठाकरे यांनी केले.
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘भक्ती संगम’ कार्यक्रमाच्या उद्घाटनाला नाशिककरांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचं चित्र पाहायला मिळालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सहाहून अधिक मंत्री कार्यक्रमाला उपस्थित असतानाही सभागृहातील निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या. कार्यक्रमस्थळी गर्दी वाढवण्यासाठी शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पाचारण करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, दोन हजार आसनक्षमता असलेल्या सभागृहात मोठ्या प्रमाणात खुर्च्या रिकाम्या राहिल्याने आयोजकांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिककरांमध्ये असलेला रोष आणि प्रशासनाच्या कारभाराबाबतची नाराजी या निमित्ताने पुन्हा चर्चेत आली आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या तयारीच्या सुरुवातीलाच प्रशासन आणि नाशिककर यांच्यातील नाराजी समोर आल्याची चर्चा रंगली आहे.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने (टीडीएफ) अखेर आपला उमेदवार जाहीर केला आहे. २३ ऑगस्ट रोजी झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीनंतर संस्थाचालक कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या नावावर टीडीएफच्या निवड समितीने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे टीडीएफकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिलेले सचिन सानप यांना उमेदवारी मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यात मागील 17 ते 18 दिवसापासून आदिवासी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आहे. या शिष्टमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांसोबत सुरू आहे.
आम्ही तीन वर्षापासून आमच्या मागण्या लेखी स्वरुपात दिल्या आहेत. मात्र, ते वेळकाढूपणा काढत आहे. आम्ही तीन वर्ष वेळ दिला. पण यांच्या नियतीत खोट आहे. त्यामुळे अंमलबजावणीशिवाय माघार नाही, वेळ पडली तर मुंबईला जाऊ, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.
जात पडताळणी समिती रद्द करा, अशी मोठी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली. इतर राज्यात जात पडताळणी समिती नसेल, तर मग महाराष्ट्रात कशासाठी? इतर राज्यांमध्ये जात पडताळणी समिती नाही, हे मंत्री विखे पाटलांनीच मला सांगितलं असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. दरम्यान, आंदोलनाला बसण्यापूर्वी जरांगे पाटील यांच्याशी पोलिस अधिकाऱ्यांनी चर्चा केली.
सायबर भामट्यांनी नवीन पनवेल येथे राहणाऱ्या एका सेवानिवृत्त वृद्धाला अटक करण्याची भीती दाखवून आठवडाभर घरामध्ये नजरकैदेत ठेवले. तसेच त्यांच्याकडून 13 लाख रुपये फसवणूक करून घेतले. वृद्धाच्या पत्नीला फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी खांदेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी सायबर टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आजपासून सुरू होणाऱ्या आंदोलनातील 13 मागण्या समोर आल्या असून, राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. जरांगे पाटील आंदोलनाला आजपासून बसणार आहे.
1) निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदी त्या नोंदीची कुणबी प्रमाणपत्र सर्वाच्या सर्व तात्काळ वाटप कराव...
2) हैदराबाद गॅझिटिअरचा फक्त जीआर काढण्यात आलाय. गॅझिटिअरमध्ये असलेल्या संख्येनुसार मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र देण्यातच आले नाहीत कुणबी नोंदीच्या संख्येनुसार मराठवाड्यातील सगळ्या मराठा समाजाला तात्काळ कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करावं आणि याची व्हॅलिडीटी कशी देणार हे पण लगेच स्पष्ट कराव...
3) सातारा संस्थान गॅझेटटियर, कोल्हापूर संस्थान गॅझेटटियर, औंध -पुणे -बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेटटियर तात्काळ जीआर काढून लगेचच अंमलबजावणी करावी...
4) महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावीत, अंतरवाली सराटीतील गुन्हे मागे घ्यावे.
5) मराठा आणि कुणबी हे स्वतंत्र मंत्रालय मराठा समाजासाठी लगेच स्थापन करावं...
6) ज्यांनी ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेत त्यांना आजची आज कुणबी प्रमाणपत्र द्यावं ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत त्यांना लगेचच व्हॅलिडिटी द्यावी...
7) मराठा समाजाला ही ओबीसींच्या सर्व सवलती सोयी सुविधा देण्याचा जो जीआर काढण्यात आला त्या जीआरची अंमलबजावणी करावी...
8) सारथीच्या सर्व योजना सुरू करण्यात याव्यात पंजाबराव देशमुख शिष्यवृत्तीचे पैसे तात्काळ द्यावे होस्टेलच्या सुविधा पण द्या...
9) मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बांधवांच्या कुटुंबियांना तात्काळ नोकरी द्यावी आर्थिक निधी लगेच द्यावा...
10) शिंदे समितीला पुन्हा कुणबी नोंदणी शोधण्यासाठी आजपासूनच रेकॉर्ड तपासण्याचे सांगावे...
11) EWS/SEBC/ESBC मधून निवड झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना आजचे आज नियुक्त द्याव्या...
12) मराठा तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत वाहने दिली त्यातूनच व्याज परतावा सरकारने दिले नाहीत.त्या व्याज परताव्याची सपूर्ण रक्कम आजच्या आज द्यावी...
13) सगे- सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी..
मनुस्मृतीच्या संदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टिपणीवरून भाजपच्या नेत्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वकील नाझिया खान यांनी गांधी यांच्याविरोधात गाझियाबाद पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला असले तरी गांधी यांनी केलेली टिपणी आक्षेपार्ह असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गांधी यांनी जेव्हा वक्तव्य केले तेव्हा व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची छायाचित्रे दाखविण्यात आली होती. ही छायाचित्रे दाखवण्याचे औचित्य गांधी यांनी स्पष्ट करावे, असे खान यांनी म्हटले आहे.
सायबर भामट्यांनी नवीन पनवेल येथे राहणाऱ्या एका सेवानिवृत्त वृद्धाला अटक करण्याची भीती दाखवून आठवडाभर घरामध्ये नजरकैदेत ठेवले. तसेच त्यांच्याकडून 13 लाख रुपये फसवणूक करून घेतले. वृद्धाच्या पत्नीला फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी खांदेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी सायबर टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
समृद्धी महामार्गावर नाशिकच्या मलढोण शिवारात वाहने पंक्चर करून प्रवाशांना मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना घडली. 11 ते 12 जणांच्या टोळीने एका वाहनातील प्रवाशांकडील तब्बल 27.8 तोळे दागिने आणि 84 हजार 500 रुपये रोख असा एकूण 18 लाख नऊ हजार 500 रुपयांचा ऐवज लुटला. दुसऱ्या वाहनातील प्रवाशांनाही दांडक्याने मारहाण करण्यात आली. दरम्यान, तिसरे वाहन अडविल्यानंतर त्यातील एका प्रवाशाने पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याने दरोडेखोर पळून गेल्याची चर्चा आहे. मात्र, याला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.
मराठा आरक्षणातील 58 लाख नोदींच्या आधारे सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्या, या जुन्या मागणीसह जात पडताळणीत नाकारलेली प्रमाणपत्रेही द्यावीत, या मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून बेमुदत उपोषण आंदोलनाला बसणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.