Radheshyam Mopalwar  Sarkarnma
महाराष्ट्र

Radheshyam Mopalwar : मोपलवारांचा राजीनामा; परभणी, हिंगोलीतून घेणार दिल्लीच्या राजकारणात उडी?

Political News : माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी मुख्यमंत्री वॉर रूमच्या महासंचालकपदाचा राजीनामा दिला आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. त्यासाठी महायुती व इंडिया आघाडी आतापासूनच कामाला लागले आहेत. त्यासाठी राज्यातील राजकीय पक्षानी रान पेटवले असतानाच त्यामध्ये आता आणखी एका नावाची भर पडली आहे.

राज्यातील माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार (Radheshyam Mopalwar) यांनी मुख्यमंत्री वॉर रूमच्या महासंचालकपदाचा राजीनामा दिला आहे. मोपलवार यांनी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात असले तरी आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी परभणी, हिंगोली लोकसभा मतदार संघातून मोपलवार हे रिंगणात उतरणार असल्याचे समजते.

'एमएसआरडीसी'च्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून मोपलवार यांना काही दिवसांपूर्वीच दूर करण्यात आले होते. राज्यातील मेट्रो, सागरी सेतू, उड्डाणपूल, रस्ते आदी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी वॉर रूमची स्थापना केली होती. या वॉर रूमच्या माध्यमातून प्रकल्पांचा आढावा घेतला जात होता. त्यानंतर गुरुवारी मोपलवार यांनी मुख्यमंत्री वॉर रूमचा अचानक राजीनामा दिला. मोपलवार यांनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला असल्याचे कळते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे निकटवर्तीयाशी असलेले संबंध बिघडल्याने मोपलवार हे गेल्या काही दिवसापासून नाराज होते. त्यामुळे राजीनामा दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मोपलवार यांनी आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मोपलवार परभणी अथवा हिंगोली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची चाचपणी करीत आहेत. त्यामुळे ते या दोनपैकी एका ठिकाणी निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते कुठल्या पक्षाकडून की अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार हे ठरले नसले तरी याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

सेवानिवृत्तीनंतरही देण्यात आली होती मुदतवाढ

राधेश्याम मोपलवार हे फेब्रुवारी २०१८ मध्ये वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. मात्र, सेवानिवृत्तीनंतरही त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. 'एमएसआरडीसी'मध्ये असताना मोपलवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला गती दिली होती. या प्रकल्पाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये खुला झाला. 'एमएसआरडीसी'मध्ये असतानाच मोपलवार यांची वर्णी वॉर रूमवर लागली होती. आता त्यांनी सर्वच पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी या पदाचा राजीनामा दिल्याने आता ती काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sachin Waghmare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT