Latur News : लातूरमध्ये विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. या कार्यक्रमाला देशमुख कुटुंबानं हजेरी लावली. तसेच यावेळी राज्यातील काँग्रेसचे बडे नेते व लातूरमधील नेतेमंडळी देखील या कार्यक्रमाला हजर होते.
यावेळी अभिनेता रितेश देशमुख भाषणात विलासराव देशमुख यांच्या आठवणींना रितेशनं उजाळा दिला. वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना रितेश भावूक झाले. यावेळी बोलताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यासोबतच काका आणि पुतण्याचं प्रेम कसे असलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी असल्याचे सांगताना रितेश देशमुख भावूक झाले होते.
आज साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्ष झाली. त्यांची आजही उणीव नेहमीच भासते, पण ही उणीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका नेहमी मागे उभे राहिले. काकांना बऱ्याच वेळेस बोलता आले नाही, काही गोष्टी सांगता आल्या नाहीत पण, आज मी सर्वांसमोर सांगतो, काका मी तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो, असे म्हणत अभिनेते रितेश देशमुख यांनी दिलीपरावांसमोर आपल्या भावना आणि प्रेम व्यक्त केले.
आजकाल राजकारणामध्ये कुठल्या-कुठल्या पातळीला भाषण जातात हे पाहून दु:ख होते. जो महाराष्ट्र एकेकाळी दिग्गज नेते त्याच्या भाषणांना गाजवला, तो काळ आता दिसत नाही. भावा-भावांचं प्रेम विलासराव साहेब आणि दिलीपराव साहेबांनी (Diliprao Deshmukh) शिकवले. काका आणि पुतण्यामधील प्रेम कसे असावं याचं हे उत्तम उदाहरण आहे, असंही रितेशने यावेळी सांगत इतर काका-पुतण्याच्या नातेसंबंधाविषयी चिमटा काढला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अभिनेता रितेश देशमुख वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना भावूक झाला. विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश देशमुखला रडू कोसळलं आणि रितेश उपस्थितांसमोर मंचावरच हुंदके देऊन रडू लागला. यावेळी रितेश हा विलासराव देशमुखांच्या आठवणीत भावूक झाला. रितेशचे मोठे भाऊ अमित देशमुख (Amit deshmukh) यांनी रितेशला यावेळी सावरले. अमित व रितेशच्या डोळ्यांत पाणी पाहून आई वैशाली देशमुख यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होते.