BJP On Nashik Lok Sabha Constituency :भाजपचा गेम प्लान... शिंदे, अजित पवार गटाचे धाबे दणाणले

Nashik Political News : नाशिकच्या जागेची मागणी करीत शिवसेना, राष्ट्रवादीला दे धक्का
Eaknath Shinde, Devendra Fadanvis, Ajit pawar
Eaknath Shinde, Devendra Fadanvis, Ajit pawar Sarkarnama

Nashik News: नाशिक लोकसभेच्या जागेची मागणी करीत भाजपने शिवसेनेला पहिला धक्का दिला आहे. भाजप नाशिक लोकसभेच्या जागेसाठी आग्रही आहे, याची चर्चा सुरू होतीच. पण आता भाजपच्या पदाधिकाऱ्यानी थेट मागणी केल्याने या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले. भाजपच्या आक्रमणापुढे शिवसेना शिंदे गट अथवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काय भूमिका घेणार हे पहावे लागेल. 

नाशिकमध्ये भाजप, राष्ट्रवादी दिंडोरीतून तर मालेगाव धुळे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडे जाऊ शकतो. याबाबत सुरू असलेल्या चर्चांनुसार भाजपने आपले फासे फेकले आहेत. तिर्थक्षेत्र व धार्मिक पर्यटनाच्या ठिकाणी आपले अस्तित्व असायलाच हवे, या भाजपच्या राजकीय अजेंड्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वाट्याला नेमकी काय येणारं याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस दिंडोरी आणि नाशिकची जागा लढवते. तर नाशिकला शिवसेनेचा खासदार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक लोकसभा मतदार संघातील सहापैकी नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य या तीन विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार प्रतिनिधित्व करतात. तर, देवळाली आणि सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे दोन आमदार आहेत. याशिवाय नाशिक महापालिका आणि त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. याच आधारे आता भाजपच्या पाच आमदारांसह तीन जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा संपर्क प्रमुख केदा आहेर यांच्या मार्फत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाशिक लोकसभा जागा भाजपसाठी सोडण्याची मागणी केली आहे.

Eaknath Shinde, Devendra Fadanvis, Ajit pawar
Lok Sabha Election 2024 : आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यातूनच ओवेसी उडविणार ‘पतंग’

नाशिक लोकसभा मतदार संघ हा मूळ शिवसेनेचा असून, येथे सध्या शिंदे गटाचे हेमंत गोडसे प्रतिनिधित्व करतात. तिसऱ्या टर्मसाठी त्यांची तयारी सुद्धा सुरू आहे. मात्र, भाजपने यावेळी नाशिक लोकसभा निवडणूक लढवयाचीच असा चंग बांधला आहे. इतक्या दिवस याबाबत फक्त चर्चा होत होत्या. भाजपकडून थेट दावा केला जात नव्हता. मात्र, आता ज्या पद्धतीने भाजपने मागणी केली आहे, त्यानुसार ही जागा भाजपला सुटण्याची चिन्हे दिसून येतात. भाजपकडून लढण्यासाठी इच्छुकांची कमी नसली तर शिवसेना उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भाजपला रोखण्यासाठी काय रणनिती आखली जाते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  

Eaknath Shinde, Devendra Fadanvis, Ajit pawar
Congress News : काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? आणखी एका बड्या नेत्यानं वाढवलं टेन्शन...

यांची आहे मागणी

नाशिक लोकसभेची जागा भाजपला सोडावी यासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र देण्यात आले आहे. या पत्रावर नाशिक लोकसभा निवडणूक प्रमुख केदा आहेर, नाशिक लोकसभा समन्वयक गिरीश पालवे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, अॅड. राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर यांच्यासह नाशिक महानगरप्रमुख प्रशांत जाधव, नाशिक जिल्हाध्यक्ष (दक्षिण) सुनिल बच्छाव, जिल्हाध्यक्ष (उत्तर) शंकर वाघ, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, जेष्ठे नेते विजय साने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Eaknath Shinde, Devendra Fadanvis, Ajit pawar
Kedar Dighe on Eknath Shinde : शिवसेना वाचवण्यासाठीच नागरिक शिंदेंची सभा सोडून जातात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com