Rohit Pawar on Praful Patel and Sunil Tatkare: दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात झाला की घात याबाबत आमदार रोहित पवार यांच्या काल (बुधवारी) पत्रकार परिषदेनंतर केलेल्या दाव्यानंतर अजितदादांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला आहे. रोहित पवार यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.
बारामती विमानतळावर 28 जानेवारी रोजी अजितदादांचा अपघात झाला होता. त्यापूर्वी 27 जानेवारी रोजी काय घडलं होते, याबाबत रोहित पवार यांनी सगळं सांगितले. अजितदादा 27 तारखेलाच मुंबईहून बारामतीला कारने येणार होते, पण एका फाईलवर सही करण्यासाठी थांबले होते. याबाबत विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोदराव हिंदूराव यांनी यापूर्वी माहिती दिली आहे. याबाबत रोहित पवार यांनी सविस्तर माहिती दिली.
अजित पवार गाडीने प्रवास करणार होते पण त्यांना एका नेत्याच्या भेटीमुळे उशीर झाला आणि त्यांनी प्रवासाचा निर्णय बदलला, असा दावा रोहित पवार यांनी केला. याच दाव्याला प्रमोद हिंदुराव यांनी दुजोरा दिला आहे. 27 तारखेला सुनील तटकरे यांनी स्वतः सांगितले की तिथं स्वतः आलो, उशीरापर्यंत थांबलो. दुसर्या बाजूला प्रफुल्ल पटेल यांचा फोन आला असे हिंदूराव सांगत आहेत.
पटेल यांचा फोन आल्याने दादा तेथे थांबले. त्यामुळे उशीर झाला. तेथे एका राजकीय सल्लागार संस्थेबाबत (पॉलिटिकल कन्स्लटन्शी) चर्चा सुरु झाली. त्या व्यक्तीचा शेकडो कोटींचा कॉन्ट्रक्ट कॅन्सल करण्यासाठी अजितदादांची भूमिका होती. त्यामुळे वाद सुरु होता. दादा त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांच्याशी बोलत होते. सुनील तटकरे हेही त्याठिकाणी उपस्थित होते. विशेष म्हणजे पॉलिटिकल कन्स्टलन्शीने विमान सुद्धा विकत घेतलं आहे. त्यादिवशी दादांना उशीर झाला म्हणून ते गाडीने जाण्याऐवजी विमानाने गेले, असे रोहित पवार यांनी सांगितले.
अजितदादा 27 जानेवारीला पुण्याला कारने गेले असते तर पुण्याला पोहचले आणि दुसऱ्या दिवशी बारामतीला गेले असते. तर मग ही दुर्दैवी घटना घडली नसती. 27 तारखेला ज्या ज्या गोष्टी घडल्या त्यावर मी अगोदर बोललो आहे. बैठकीला उशीर झाला. त्यानंतर कुणाचा फोन आला हे लोकांना आता कळालं आहे. फाईलवर मुद्दामहून तिथल्या तिथं स्वाक्षरी झाली पाहिजे, अशी एका नेत्याने इच्छा व्यक्त केली. त्यामुळे दादांनी ती स्वाक्षरी केली, असे रोहित पवार म्हणाले.
संध्याकाळी 7.13 वाजता, विमानाचं बुकिंग झालं. जर दादांचं विमानाने जाण्याचा प्लॅन झाला असता तर 26 तारखेला संध्याकाळी अथवा 27 तारखेलाच दुपारी विमानाचं बुकिंग झालं असतं. जी काही क्रमवारी ती मी बोलून दाखवली. मी कुणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं नाही, असे सांगत त्यांनी थेट संबधीत नेत्यांचे नाव घेण्यास टाळले.
रोहित पवार म्हणाले, "27 तारेखापासून ते 28 तारखेपर्यंत झालेल्या घटनांची चौकशी व्हायला पाहिजे. तर प्रमुख पायलट होते. ते कुणाला भेटले. कुणाच्या संपर्कात होते,सु्द्धा चौकशी व्हायला हवी." अजितदादांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांनी अनेक शंका उपस्थित केल्या. खासगी विमान कंपनीच्या कारभारावरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
प्रफुल पटेल की आणखी कुणाच्या फोननंतर अजितदादांनी प्रवासाचा निर्णय बदलला.
प्रफुल पटेल यांचा मंत्रालयातील फाईल संदर्भात फोन आल्यानंतर दादांनी ‘बाय रोड’ जाणे रद्द केले.
त्यांच्या फाईलवरील सहीला उशीर झाल्यानेच त्यांनी विमान प्रवासाचा निर्णय घेतला.
बाय रोड जाण्याचे ठरले होते. सर्व बॅगा गाडीत टाकल्या. परंतु त्याचवेळी फोन दादांना आला.
मंत्रालयात एक फाईल अडकली आहे. त्याच्यावर सही हवी आहे. म्हणून अजित पवार यांनी सचिवाला फोन केला, ती फाईल लवकर घेऊन ये, पुन्हा मी आठवडाभर नाहीये, असे त्यांनी सचिवाला सांगितले.
फाईल आणायला साडेसात आठ वाजले. मग उशीर झाल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरला सांगितले की मी विमानाने जातो. गाडीतल्या बॅगा त्यांनी परत काढल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.