

Maratha reservation protest: महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा अँक्टीव्ह झाले आहेत. पंढरपूरमध्ये येथील कार्यक्रमात त्यांनी पुन्हा मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे.
मराठा आरक्षणांच्या विविध बाबींवर त्यांनी सडेतोड भाष्य केले. माझ्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. मी मराठा आरक्षणासाठी लढत असल्याने माझ्या हत्येचा कट रचला जात आहे, असे ते म्हणाले.
"मला वैरी समजायला लागले असून माझ्या घातपाताच्या सुपाऱ्या दिल्या जात आहे. पण मायबाप जनता आहे तो पर्यंत भीती नाही. सरकारच्या तळी उचलणारे म्हणतात आता कोणी सोबत नाही. एकाच गावात येऊन बघ, समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ लागले, सरकारी चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. मी त्यांच्यासाठी लढलो मग समाज माझ्या मागे राहील ना," असे जरांगे म्हणाले.
"मी गरीबांच्या लेकरासाठी काम करतो. समाजाच्या जीवावर दुकानदारी चालवणारे, पैसे कमवणाऱ्यांना का मोठे करायचं? मला गोरगरीबांना मोठं करायचं आहे. ज्यांना जवळ राहून मोठे व्हायचे त्यांनी माझ्या जवळ राहू नये. मी जवळचा एक पण मोठा होऊ दिला नाही म्हणून आरोप होतात. मायबाप विचार करून बघा, मोठे करणे म्हणजे काय? काम द्यायची का, समाजाच्या जीवावर मोठे व्हायचे नाही, " असे जरांगे म्हणाले.
व्यसनापासून लांब रहा, असा सल्ला जरांगे यांनी तरुणांना दिला. आरक्षणाचा लाभ घ्या, आरक्षण घ्या लाजू नका, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. कार्यक्रमात मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या विविध मुद्यांवर भाष्य केले.
दोन वर्षात 58 लाख नोंदी दिल्या, सातारा संस्थानाचा आदेश निघणार, मी मराठे मोठे केले म्हणून माझा सुपाऱ्या देत आहेत. जवळचे लोक फोडून काहीही वदवून घेतात. भंगार जातीला खुश करण्यासाठी आपली जात बदनाम करू नका. शेवटी मदतीला जात येते, असे ते म्हणाले.
यापूर्वी बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती उघड झाली आहे. अडीच कोटी रुपयांत ही हत्या करण्याचा कट रचला होता. या प्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीडमधून दोघांना ताब्यात घेतलं होतं. कट रचणारा हा बीडच्या परळीतील एक बडा नेता असल्याचा आरोप केला जातो आहे.
जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट बीड जिल्ह्यात झालेल्या एका बैठकीत रचण्यात आला होता. त्याच बैठकीत असलेल्या समर्थकाने जरांगे पाटील यांना ही बाब सांगितली. पोलिस अधीक्षकांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत गेवराई येथील दोन संशयितांना पथकाच्या माध्यमातून तातडीने ताब्यात घेतले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.