Rohit Pawar stands with ST Employees : एसटी कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचा पगारात तब्बल 44 टक्के कपात करण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट यावरून अर्थखात्यावर निशाणा साधला आहे. तर, पगारासाठी कर्मचारी देखील आक्रमक झाले आहेत. आत्ता या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला.
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'ST कर्मचाऱ्यांना पगार देण्याऐवजी फक्त वल्गना करण्यातच हे सरकार धन्यता मानताना दिसत आहे. या महिन्याची १० तारीख आली तरी पगार होत नाहीत, या महिन्यात तर केवळ ५५% पगार म्हणजे २०००० पगार असेल तर केवळ ११००० पगार झाला.'
सरकारकडे एसटीला द्यायला पैसे नसतील तर आमदारांचे, मोठ्या अधिकाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार आधी करा,अशी ही विनंती देखील रोहित पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी निम्म्या पगारात घर चालवायचं तरी कसं? अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यावर बोलतील अशी अपेक्ष व्यक्त करत मतदान सरो मतदार मरो, असे लिहित सरकारला टोलाही लगावला आहे.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी अर्थखात्याकडून परिपूर्तीचा निधी यायला हवा होता तो आला नसल्याचे संताप व्यक्त केला. ते म्हणाले, आम्ही फाईल अर्थखात्याकडे पाठवली आहे. आम्ही भीक मागत नाही तर आमचे अधिकार मागत आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार सात तारखेला व्हायला हवा.
एसटी कर्मचाऱ्यांना कपात केलेले 44 टक्के वेतन मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी वित्त विभागाच्या सचिवांशी या संदर्भात फोनवर चर्चा देखील केली. येत्या मंगळवारपर्यंत कर्मचाऱ्यांचे कपात केलेले 44 टक्के वेतन मिळेल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.