<div class="paragraphs"><p>Rohit Pawar - Pankaja Munde</p></div>

Rohit Pawar - Pankaja Munde

 

Sarkarnama

महाराष्ट्र

रोहित पवारांची ऑफर; पंकजा मुंडेंनी विचार केला तर त्यांच्यासाठी खुर्ची सोडू!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे-पवार घराण्यातील सत्तासंघर्ष नवीन नाही. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या काळापासून सुरु असलेला हा संघर्ष आजही सुरु आहे. मात्र आता खुद्द शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीच पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना खुर्चीची ऑफर दिली आहे. एका चॅनेवरील कार्यक्रमात जाहीररित्या पंकजा मुंडेंनी विचार केला तर त्यांच्यासाठी खुर्ची सोडू असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

एका चॅनेलवरील रिअॅलिटी शो मध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar), काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) सहभागी झाल्या होत्या. यावेळी काही खेळ या तिन्ही नेत्यांमध्ये खेळण्यात आले. यातील संगीत खुर्ची या खेळा दरम्यान दोन खुर्ची आणि तीन नेते असल्याने निवेदक असलेल्या संकर्षण कऱ्हाडे यांनी रोहित पवार आणि प्रणिती शिंदे यांना पंकजा मुंडेंना मदत करणार का? असा सवाल विचारला.

त्यावर रोहित पवार गंमतीने म्हणाले, आम्ही सहकार्य करु, पण पंकजा ताईंनी त्या पद्धतीने विचार केला तर आम्ही त्यांच्यासाठी खुर्ची सोडू, असे म्हणतं पंकजा यांनी तयारी दाखवली तर रोहित पवार यांनी युतीची ऑफर दिली. यावर प्रणिती शिंदे यांनी गंमतीने हे असे जाहीररित्या सांगायचे नसते, आमचंही आधीच ठरलं असल्याचे सांगितले. त्यावर पुन्हा रोहित पवार यांनी तुम्ही आम्हाला सोडून कसे ठरवले असा सवाल केला. पुढे खेळ सुरु झाल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रणिती शिंदे यांनी पहिला राऊंड जिंकला.

पुढे पुन्हा पंकजा मुंडे आणि प्रणिती शिंदे या दोघींमध्ये खुर्चीचा खेळ रंगला. यात प्रणिती शिंदे जिंकल्या. त्यावर प्रणिती शिंदे यांनी पंकजा मुंडेंसमोर खुर्ची शेअर करण्याची ऑफर ठेवली. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच हशा पिकला. पुढे युतीच्या चर्चेवेळी प्रणिती शिंदे यांनी मैत्रीण म्हणून प्रणिती आणि पंकजा यांची युती व्हायला काहीच हरकत नसल्याचे म्हटले. त्यावर पुन्हा हशा पिकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT