Devendra Fadnavis, Ajit Pawar, Rohit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar News: अजित पवार गटातील आमदार देवेंद्र फडणवीसच पाडणार!

सरकारनामा ब्यूरो

Rohit Pawar On Devendra Fadnavis : नवाब मलिकांना महायुतीत स्थान नाही, या आशयाचे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले. अजित पवारांना देखील याबाबत माध्यमांसमोर स्पष्टीकरण द्यावे लागले. मात्र, दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये झालेला हा पत्रव्यवहार हा देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून माध्यमांपर्यंत पोहचवण्याची घबरदारी घेतली. त्यातून अजित पवारांची कोंडी झाली. त्यांना भुमिका बदलावी लागली. तसेच देवेंद्र फडणवीस हे अपक्ष उमेदवार उभे करून अजित पवार गटातील आमदारांना पाठणार असल्याचा सणसणाटी आरोप राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केला.

माजी मंत्री नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या बाकांवर बसले होते. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून यावर आक्षेप नोंदवला होता. नवाब मलिक यांना महायुतीत स्थान नसल्याचे ही आपल्या पत्रात फडणवीस म्हणाले होते. मात्र, हे पत्र माध्यमांच्या समोर आल्याने अजित पवार यांची कोंडी झाली. त्यांना या बाबत स्पष्टीकरण द्यावे लागले. अजित पवार हे विचार करणारे व्यक्ती आहेत. लढणारे व्यक्ती आहेत. मात्र, भाजपच्या सांगण्यावरून त्यांना आपली भूमिका बदलत असेल तर हा विषय येथेच थांबत नाही, असा सूचक इशारा रोहित पवार यांनी दिला.

देवेंद्र फडणवीसांच्या पत्रामुळे जर अजित पवारांना आपली भूमिका बदलावी लागत असेल तर त्यांच्या आमदारांमध्ये काय संदेश जातो. आमदारांमध्ये भीती आहे की भाजप अजित पवार गटाच्या आमदारांच्या विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार उभे करेल. त्या अपक्ष उमेदवारांना ताकद देईल. त्यामुळे आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. अजित पवार मित्र मंडळाचे नेते देखील या आमदारांना वाऱ्यावर सोडतील,असा इशारा देखील रोहित पवार यांनी दिला.

राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठी प्रफुल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यांच्यामुळेच अजित पवार हे भाजप सोबत गेले. प्रफुल पटेल यांनी स्वतःच्या फायद्यासाठी हे सर्व केले. त्यांना अटक होण्याची भीती वाटत होती. जे आरोप नवाब मलिकांवर लावण्यात आले तसेच आरोप प्रफुल्ल पटेलांवर आहेत. ईडीने त्या संदर्भात कारवाई देखील केली आहे. मात्र, भाजप नवाब मलिकांबाबत एक धोरण आणि पटेलांबाबत दुसरे धोरण स्वीकारत आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे ते अजित पवारांच्या कानाला लागले. त्यांनी दादांची मानसिकता बदलली, असा आरोप देखील रोहित पवार यांनी केला.

Edited by Roshan More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT