Rohit Pawar press Conference on Ajit Pawar Plane crash  Sarkarnama
महाराष्ट्र

Rohit Pawar Press : 210 कोटींच्या इन्शुरन्ससाठी अजित दादांचं विमान पाडलं? रोहित पवारांच्या गंभीर आरोपाने खळबळ

Rohit Pawar press Conference on Ajit Pawar Plane crash : रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत 210 कोटींच्या विमा दाव्यासंदर्भात अजित पवारांवर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले. महाराष्ट्राच्या राजकारणातील या वादाची संपूर्ण माहिती वाचा.

Rashmi Mane

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रावादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा गंभीर शंका उपस्थित करत हा अपघात नसून घातपात असू शकतो, असा दावा केला आहे. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काही नवीन आणि गंभीर माहितीच्या आधारे तांत्रिक मुद्द्यांचा उल्लेख करत घातपाताचा संशय दृढ झाल्याचे सांगितले आहे.

रोहित पवार म्हणाले की, 27 तारखेला घडलेल्या काही घटनांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या दिवशी काही व्यत्कींची भेट, आलेले फोन कॉल्स आणि त्यानंतर घडलेली घटना यामध्ये संबंध असू शकतो का?, याचा तपास होणे गरजेचे आहे. रोहित पवारांच्या मते समोर येत असलेली माहिती पाहता हा केवळ अपघात नसून नियोजनबद्ध कारवाई असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विमानाच्या खरेदीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, हे विमान मूळ 35 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले होते. मात्र त्याची सध्याची स्थिती आणि इंजिनची गुणवत्ता पाहता आज त्याची बाजारातील किंमत जास्तीत जास्त 10 ते 15 कोटी रुपये असू शकते. काही तज्ज्ञांच्या मते आणि ज्यांनी हे विमान पूर्वी चालवले, त्यांच्या मते तर 10 कोटींनाही ते घेणे योग्य ठरले नसते. असे त्यांनी नमूद केले.

रोहित पवारांनी इन्शुरन्स संदर्भात त्यांनी मोठा मुद्दा उपस्थित केला आहे. विमानाची इन्शुरन्स व्हॅल्यू सुमारे 55 कोटी रुपये होती. मात्र ‘लायबिलिटी इन्शुरन्स’ तब्बल 210 कोटी रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.

या रकमेचा समावेश विमानात बसलेली लोकं, विमान एखाद्या घरावर किंवा प्राण्यांवर पडले तर होणारे नुकसान, या सर्वांचा समावेश होतो. याशिवाय 210 कोटी रुपयांच्या एकूण विमा रकमेपैकी मुख्य पायलटला किती रक्कम मिळाली असती, ही माहिती त्यांना होती का, आणि प्रत्यक्षात ही रक्कम मिळणार होती का, 210 कोटींच्या इन्शुरन्ससाठी अजित दादांचं विमान पाडलं का? याबाबत स्पष्टता आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

तपास प्रक्रियेवरही त्यांनी टीका केली. केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांनी 90 कोटी रुपये खर्चून आधुनिक तपास प्रयोगशाळा सुरू केल्याचे सांगितले जाते. मग या प्रकरणाचा तपास देशाबाहेर का पाठवला जात आहे? भारतात उपलब्ध तांत्रिक साधनांचा वापर का केला जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

विमानातील इंधन टाकीबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला. अतिरिक्त Fuel Can ठेवण्यात आले होते का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच ब्लॅक बॉक्समध्ये तांत्रिक अडचण किंवा तो जळाल्याचे कारण पुढे केले जात असल्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT