Ajit Pawar plane crash : अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट; तटकरे-पटेल यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, नेमकं काय आहे 'त्या' पत्रात?

Ajit Pawar plane crash case latest update : अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. तटकरे आणि पटेल यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले असून त्या पत्रात नेमके काय नमूद आहे? सविस्तर जाणून घ्या.
State government orders CID investigation into the aircraft accident involving Ajit Pawar
State government orders CID investigation into the aircraft accident involving Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सध्या राज्यातील राजकारणाच्या केंद्रभागी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांमध्ये सातत्याने या दोन नेत्यांचं नाव समोर येत आहे. त्यामध्ये खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा समावेश आहे. आता याच नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक अधिकृत पत्र सादर केल आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून चौकशीची मागणी केली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांच्या सहीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र सादर करण्यात आले आहे.

State government orders CID investigation into the aircraft accident involving Ajit Pawar
Rahul Gandhi net worth : राहुल गांधींकडे नेमकी संपत्ती किती ? फक्त एका वर्षाचा आकडापाहून तुम्हीही व्हाल थक्क!

या पत्रात अपघाताबाबत गंभीर अनियमितता आणि संशयास्पद परिस्थिती असल्याचे नमूद करून केंद्रीय यंत्रणेमार्फत तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतानुसार, अपघाताबाबत नोंदवलेली आणि गोळा करण्यात आलेली विविध तथ्ये अनेक गंभीर प्रश्न निर्माण करत आहेत.

या अपघातात 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील इतर चार जणांचा मृत्यू झाला होता. राष्ट्रवादीच्या या मागणीमुळे प्रकरण अधिक गंभीर आणि संशयास्पद बनले आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे या मागणीवर केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले जात आहे.

State government orders CID investigation into the aircraft accident involving Ajit Pawar
New IAS Transfer Policy : मंत्री, मुख्यमंत्र्यांकडे आता वशिलेबाजी चालणार नाही! IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी राज्य सरकारचा क्रांतिकारी निर्णय

काय आहेत पत्रातील ठळक मुद्दे

  • हवाई वाहतूक नियंत्रण - संवाद आणि धावपट्टीवरील परवानग्यांच्या क्रमवारी बाबत आढळलेल्या संभाव्य विसंगती.

  • विमानातील अत्यावश्यक सुरक्षा इशारा प्रणाली च्या कार्यक्षमतेबाबत आणि विश्वसनीयतेबाबत व्यक्त केलेल्या चिंता.

  • लँडिंगच्या टप्प्याजवळ असूनही कोणताही आपत्कालीन संदेश नोंदवला न गेल्याची बाब.

  • राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशीसाठी सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणेची गरज व्यक्त केली आहे, जेणेकरून सर्व शंका दूर होतील आणि सत्य समोर येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com