Powai Encounter Case, Eknath Shinde, Deepak kesarkar And Rohit Arya sarkarnama
महाराष्ट्र

Rohit Arya Case : रोहित आर्यला चेकद्वारे मदत, हेतू अन् भूमिक संशयास्पद : दीपक केसरकर मंत्रि‍पदावर नसतानाही अडचणीत

Deepak Kesarkar in Powai Encounter Case : मुंबईतल्या पवई परिसरामध्ये गुरुवारी (ता.30) दुपारी रोहित आर्य या व्यक्तिचा एन्काउंटर करण्यात आला. रोहितने आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी 17 लहान मुलांसह दोन प्रौढांना एका स्टुडिओमध्ये ओलीस ठेवले होते. त्यांची सुटका करताना झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला होता.

Aslam Shanedivan

  1. पवईत रोहित आर्य याचा पोलिसांकडून एनकाउंटर झाल्यानंतर आता या प्रकरणावर राजकीय वाद निर्माण झाला आहे.

  2. तत्कालिन शिक्षणमंत्री यांनी "मी स्वतः चेकने पैसे दिले" असे वक्तव्य केल्यामुळे संशय वाढला आहे.

  3. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी शिक्षण मंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे.

Mumbai News : मुंबईतल्या पवई परिसरामध्ये गुरुवारी (ता.30) दुपारी झालेल्या एन्काउंटरने राज्यात खळबळ उडाली आहे. रोहित आर्य या व्यक्तिचा पोलिस चकमकीत मृत्यू झाला. त्याने आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी 17 लहान मुलांसह दोन प्रौढांना एका स्टुडिओमध्ये ओलीस ठेवले होते. आता या प्रकरणावरून राज्य सरकार आणि तत्कालिन शिक्षण मंत्र्यांच्या हेतूवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तळकोकणातील नेते आमदार तथा माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

“रोहित आर्यने राज्य सरकारने त्याचा वापर स्वच्छता दूत म्हणून करून घेतला. कामे पूर्ण होताच त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तसेच त्याची कल्पनाही चोरून मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान सुरू केले. शासनाने याचा कुठलाही मोबदला दिला नाही, असे आरोप करत सरकारकडे दाद मागितली होती. पण त्याच्या पदरी निराशाच आली आणि त्याने आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी 17 लहान मुलांसह दोन प्रौढांना एका स्टुडिओमध्ये ओलीस ठेवले होते. ज्यात त्याचा शेवट धक्कादायक झाला.

यानंतर रोहित आर्यने अनेकदा उपोषणही केले. यादरम्यान तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्याच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याला उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. पण ती पाळण्यात आली नाहीत.ज्यानंतर त्याने एका पत्राद्वारे सरकारला इशाराही देताना एका पत्रात, “जर मी आत्महत्या केली, तर दीपक केसरकर, त्यांचे वैयक्तिक सचिव मंगेश शिंदे, शिक्षण आयुक्त सूरज मांधरे, तुषार महाजन आणि समीर सावंत जबाबदार असतील,” असे म्हटले होते.

दरम्यान आता या धक्कादायक एन्काउंटरनंतर केसरकर यांनी रोहित आर्यबाबत मोठा खुलासा केला होता. त्यांनी रोहित आर्यने शासनाच्या एका मोहिमेत पैसे लावले होते. त्यापोठी त्यांनी त्यांच्या खिशातून पैसे दिले, आपण स्वत: चेकने पैसे दिल्याचा खुलासा केसरकर यांनी केला होता. तसेच त्यांनी, सरकारच्या पेमेंटसाठी सर्व फॉर्मेलिटी पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे त्यांचा, 2 कोटी मला येणं आहे हा क्लेम मला तरी योग्य वाटत नाही. त्यांनी डिपार्टमेंटशी खात्री करावी आणि त्या संदर्भातील कागदपत्रे सादर करावेत", असेही केसरकर म्हणाले होते.

आता याच स्पष्टीकरणानंतर नवा वाद सुरू झाला आहे. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केसरकर यांच्यावर टीका केली. त्यांनी केसरकर यांच्या हेतूवर आणि भूमिकेवर शंका उपस्थितीत करताना, रोहित आर्यला त्यांच्या खिशातून पैसे दिल्याची गोष्ट शंका निर्माण करणारी आहे. कोणताही मंत्री कंत्राटदाराला अशा प्रकारे पैसे देणार नाही. त्यामुळे या कृतीमागील हेतू आणि प्रशासनाची, विशेषतः आयएएस सुरज मांढरे यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे आहे. केसरकरांनी स्वतः चेकद्वारे मदत केल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे या व्यवहाराचा सखोल तपास आवश्यक आहे कारण सामान्य व्यवहारात अशी वैयक्तिक मदत संशयास्पद ठरते. #रोहीत_आर्य असेही त्यांनी म्हटलं आहे.

तसेच त्यांनी दुसऱ्या एका फेसबूक पोस्टमध्ये दिवंगत रोहित आर्य यांच्या “लेट्स चेंज – निष्काळजी मुक्त महाराष्ट्र” या उपक्रमाची राज्यभरात मोठी चर्चा झाली होती. त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्ट्समधून हा उपक्रम शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या पाठबळाने राबविला जात असल्याचा आभास निर्माण केला गेला होता. पण खरंच तसं होतं का शासनाच्या अधिकृत खुलाशातून वेगळीच बाजू समोर येते. या प्रकल्पाबद्ल गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आर्याच्या अप्सरा मिडीया एन्टरटेनमेन्ट नेटवर्क या संस्थेने स्वच्छता मॉनिटर या उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता शाळांकडून जमा केलेली रक्कम शासकीय खात्यात जमा करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी.

तसेच जर शासनाच्या म्हणण्यानुसार हा प्रकल्प अधिकृतरीत्या मंजूरच नव्हता. तर मग रोहित आर्य हे शासनाच्या नावाखाली शुल्क गोळा करत होते असा समज येथे निर्माण होतो. त्यामुळे आता रोहित आर्य हे शासकीय गोंधळ आणि गैरसमजाचे बळी ठरले होते का? की त्यांनीच एक हुशार पण धोकादायक खेळ खेळला जो शेवटी उलटला? त्यामुळे खरी परिस्थिती समोर येण्यासाठी पारदर्शक चौकशी आवश्यक आहे.मगच सत्य कळेल . #रोहित_आर्य #एन्काउंटर #लेट्स_चेंज #निष्काळजी_मुक्त_महाराष्ट्र असेही त्यांनी म्हटलं आहे.

FAQs :

1. पवई एनकाउंटरमध्ये काय घडले?
रोहित आर्य या व्यक्तीने 17 मुलांना आणि 2 प्रौढांना ओलीस ठेवले होते. पोलिसांनी कारवाई करून त्याचा एनकाउंटर केला.

2. दीपक केसरकर यांचे नाव या प्रकरणात कसे आले?
केसरकर यांनी स्वतः चेकने पैसे दिल्याचे सांगितल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे.

3. आरटीआय कार्यकर्ता विजय कुंभार यांनी काय मागणी केली?
त्यांनी दीपक केसरकर यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.

4. या प्रकरणाची सध्या काय स्थिती आहे?
एनकाउंटरनंतर प्रकरणावर तपास सुरू असून, अधिक माहिती समोर येत आहे.

5. पवई प्रकरणात किती लोक ओलीस ठेवले गेले होते?
रोहित आर्यने 17 लहान मुले आणि 2 प्रौढांना ओलीस ठेवले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT