Pune News : भोंदूबाबा अशोक खरात यांनी अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला जात असून त्यांनी केलेले कारनामे समोर आल्याने संपूर्ण राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच या प्रकरणी विरोधकांकडून सडकून टीका झाली असल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या पदाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात या रिक्त झालेल्या पदावर आता कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
महायुतीमध्ये राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. त्यामुळे त्यांच्याकडेच हे पद राहणार आहे. त्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील चार महिला नेत्यांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे या चारपैकी एका नावांवर एकमत होऊ शकते.
गेल्या चार दिवसापासून भोंदुबाबा अशोक खरात यांचे नाव सध्या महाराष्ट्रात आघाडीवर आहे. भविष्यवेत्ता असल्याची बतावणी करून आतापर्यंत अनेक महिलांचे त्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्याविरोधात फेब्रुवारी महिन्यात बलात्काराची तक्रार दाखल झाल्यानंतर हे सगळे प्रकरण समोर आले. त्यातच खरात यांच्यासोबतचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचे फोटो समोर आले. त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून चाकणकर यांना पायउतार व्हावे लागले.
चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता महिला आयोगाचे अध्यक्षपद रिकामे झाल्याल्यानंतर आता या पदाचा कारभार नेमका कोणाकडे सोपवला जाणार? याची चर्चा रंगली आहे. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी चार नावे समोर आली आहेत. त्यामध्ये नाशिक जिल्हयातील देवळालीच्या आमदार सरोज अहिरे, अहिल्यानगर जिल्हयातील वैशाली नागवडे, पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, जळगावमधील राष्ट्रवादीच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. या चार नावांपैकी एका नावावर एकमत होऊ शकते. ही नावे चर्चेत असली तरी या निवडीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे भविष्यात काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
महिला आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच
रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर महायुतीमध्ये महिला आयोगाचे अध्यक्षपद पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) राहणार का? असेही विचारले जात होते. महायुतीमधील भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत या पदासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याचे पद सोडतील, असे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वाटत नाही.
दरम्यान, महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त झाले असले तरी या पदावर राज्य सरकारकडून नवीन अध्यक्षांची अधिकृत घोषणा करण्यात येणार नाही, तोपर्यंत महिला आयोगाचा प्रशासकीय कारभार आयोगाच्या सचिव किंवा एखाद्या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याकडे सोपवला जाऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.